मेष

Sandyanand    09-Aug-2020
Total Views |
 
ddddddddd_1  H
 
या आठवड्यात तुम्ही कामाकडे जास्त लक्ष द्याल. तुम्हाला तुम्ही व्यावसायिक आघाडीवर केलेल्या कामाच्या फळाच्या रुपात आर्थिक लाभ होण्याची शक्यता  आहे. तुमचे मन अनेक विचारांच्या प्रवाहात गुंतलेले असेल. यामुळे कामात व नात्यात स्थैर्य नसेल. अशावेळी महत्त्वाची कामे टाळावीत.
नोकरी/व्यवसाय :
या आठवड्यात तुमच्यामध्ये कामाचा दांडगा उत्साह असेल. तुम्ही वेगाने कामे पूर्ण करण्याच्या मूडमध्ये असाल. तुमच्या डोक्यात  कामात मोठा बदल करण्याचा विचार असू शकतो, पण हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा. तुमचे मन अस्वस्थ असल्यामुळे कामापेक्षा आरामाकडे जास्त लक्ष द्यावे.
नातीगोती :
या आठवड्यात प्रेमसंबंधाबाबत तुमच्यामध्ये उत्साह असेल पण राग आणि अहंकारावर ताबा ठेवावा. प्रियपात्रासोबत वेळ घालवाल पण मध्यात तुमचे मन काहीसे व्याकूळ राहील व त्यामुळे दूर राहणे पसंत कराल.
आरोग्य :
तुमच्यामध्ये शक्ती संचारल्यामुळे तुम्ही उत्साही असाल. आरोग्याबाबत कोणतीही मोठी चिंता असणार नाही. अस्वस्थता व मोसमी त्रासापासून जपावे. अ‍ॅसिडिटी, रक्ताभिसरणाचा त्रास असल्यास वेळीच उपचार करून घ्यावेत.
शुभदिनांक : ०९, १३, १४
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
शुभवार : रविवार, सोमवार, मंगळवार
दक्षता :
या आठवड्यात श्वास, सर्दी, फ्ल्यू, कफ, खोकला इ.ची समस्या असेल तर बेपर्वा राहू नये.
उपाय :
या आठवड्यात तिजोरीवर शुभ्र चंदनाचे लाकूड गुलाबी कापडात लपेटून ठेवा. दुकानातील देव्हाऱ्यात गायीच्या तुपात वेलदोडा टाकून दिवा लावा. गायीला गूळ-भाकरी द्या.