मीन

09 Aug 2020 10:40:53
 
ffvvgg_1  H x W
 
या आठवड्यात तुम्हाला तुमचे प्रियजन भेटतील. स्पर्धेत उत्तम परफॉर्मन्स कराल. दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. परदेशातील व दूरच्या नातलगांकडून शुभसमाचार मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे. स्वत:च्या कामात कुचराई करू नये. इतरांवर अवलंबून राहू नये.
नोकरी/व्यवसाय :
हा आठवडा प्रोफेशनल प्रगतीसाठी खूपच चांगला आहे. या आठवड्यात तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. या आठवड्यात केलेले नवे करार तुमच्यासाठी पुढे खूपच फायदेशीर ठरणार आहेत. व्यवसायवाढीच्या तुमच्या प्रयत्नांचे सार्थक होईल. वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.
नातीगोती :
प्रेमसंबंध टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. ऑफिसात वा कामावर तुम्हाला एखाद्याविषयी खूप आकर्षण वाटू शकते. तुम्ही तुमच्या प्रियपात्रासोबत बाहेर जाण्याचा प्रोग्राम ठरवू शकता.
आरोग्य :
स्नायूंमध्ये चमक भरण्याची शक्यता आहे. तसेच डोळ्यांची जळजळ, सनस्ट्रोक, नर्व्स सिस्टम व अंगाची थरथर यासारख्या समस्या राहतील. आठवड्याच्या अखेरीस अपुऱ्या झोपेमुळे डोकेदुखी सतावू शकते.
शुभदिनांक : ०९, १३, १४
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
शुभवार : रविवार, सोमवार, मंगळवार
दक्षता :
तुम्ही इतरांबाबत विचार करता व त्यांच्याकडून तशाच आचरणाची अपेक्षा बाळगता. यामध्ये या आठवड्यात थोडा बदल करावा. उपाय :
या आठवड्यात आपल्या व्यवसाय स्थळाच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजुंना शेंदराने स्वस्तिक काढावे. दुकानाच्या देव्हाऱ्यात मंगळवारी व शनिवारी लाल फूल वाहावे. कामावर जाताना पूज्य व्यक्तीचा आशीर्वाद घ्यावा. दर मंगळवारी फुलाने दुकानात सर्वत्र गंगाजल शिंपडावे .
Powered By Sangraha 9.0