मकर

09 Aug 2020 10:40:52
 
eeeeeee_1  H x
या आठवड्यात भागिदारीच्या कामात यश मिळेल. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये. मौल्यवान वस्तू जमवण्यात जास्त रुची राहील. घरातील मोठ्यांसोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही एखाद्या छोट्या पिकनिकची योजना बनवू शकता.
नोकरी/व्यवसाय :
प्रोफेशनल बाबींमध्ये तुम्ही सामान्य वेगाने पुढे जाल. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष देऊ शकता पण कुटुंबाकडे जास्त लक्ष दिल्यामुळे तुम्ही टार्गेट पूर्ण करण्यात अपयशी ठरू शकता. सुरुवातीला व्यवसायाकडे तुम्ही फारसे लक्ष देणार नाही. अखेरचा काळ यश मिळवून देईल.
नातीगोती :
या आठवड्यात तुमची नाती अत्यंत साधी राहतील. सुरुवातीला एखाद्या नात्याविषयी गोंधळलेले राहाल. अविवाहितांचे लग्न ठरू शकते. या आठवड्यात एखाद्या नव्या नात्याची सुरुवात करू शकता. एखाद्याला प्रपोज करावयाचे असेल तर शब्द जपून वापरा. आरोग्य :
या आठवड्यात तुमचे आरोग्य उत्तम राहील. तसा आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवू शकतो. यामुळे निद्रानाशही संभवतो. श्वसन, फुफ्फुसे यासंबंधित समस्या असणाऱ्या जातकांनी उपचाराकडे जास्त लक्ष द्यावे. आठवड्याच्या अखेरीस आराम मिळू शकेल.
शुभदिनांक : १०, १२, १५
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता :
या आठवड्यात आजाराबाबत बेपर्वा राहू नये. लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घ्यावा.
उपाय :
या आठवड्यात व्यवसायाच्या ठिकाणी असे बसावे की, बाहेरील व्यक्तीचे तोंड दिसणार नाही. अष्टमीला मातीचा सिंह देवीच्या मंदिरात वाहावा.
Powered By Sangraha 9.0