कुंभ

09 Aug 2020 10:40:53
 
ddddd_1  H x W:
या आठवड्यात धार्मिक यात्रेला जाऊ शकता. आत्मविश्वासात वाढ होईल. दूरच्या नातलगांकडून शुभवार्ता समजू शकते. सर्वांचे सहकार्य  तुम्हाला उत्साही ठेवील. काङ्र्मक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. घरातील वातावरण सुखद असेल व तुम्ही कुटुंबीयांसोबत उत्तम वेळ घालवाल.
नोकरी/व्यवसाय :
हा आठवडा नोकरदार व्यक्तींसाठी खूपच चांगला आहे. ते त्यांच्या टॅलंटच्या बळावर एखादे नवे टार्गेट मिळवू शकाल. या आठवड्यात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामामुळे तुमच्यावर खूश राहणार आहात. हा आठवडा भागिदारीत काम करणाऱ्यांसाठीही उत्तम असेल.
नातीगोती :
हा आठवडा नवे संबंध सुरू करण्यासाठी खूपच चांगला आहे. तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत जास्त काळ रोमँटिक राहणार आहात. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्रोग्रामही बनवू शकता. या काळात तुमचे नाते परिपक्व होईल. जोडीदाराच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे.
आरोग्य :
या आठवड्यात तुमच्या मनाचा गोंधळ उडालेला असेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता असू शकते. नकारात्मकतेमुळे कोणत्याही कामात तुमचे मन लागणार नाही. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. स्थूल, मधुमेही व्यक्तींनी जास्त जपावे.
शुभदिनांक : १०, १२, १५
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता :
या आठवड्यात नात्यांमध्ये भेदभाव करू नका.
उपाय :
या आठवड्यात व्यापार सुरू करण्यापूर्वी दुर्गा चालिसाचे वाचन करावे. लाकडी फर्निचर वापरावे तसेच व्यवसायाच्या स्थानासमोर गायीला ताजे गवत खाण्यास द्यावे.
Powered By Sangraha 9.0