कर्क

Sandyanand    09-Aug-2020
Total Views |
 
dddd_1  H x W:
 
या आठवड्यात तुम्ही कामात व्यस्त राहाल. धनलाभ होईल. समस्यांचे निवारण होईल. सामाजिक मान व प्रतिष्ठा वाढेल. व्यापारात वृद्धी होईल. सरकारी कामांना उशीर लागेल. आरोग्य उत्तम राहील. काही नवे शिकण्यासाठी प्रवृत्त व्हाल. मित्रांसोबत उत्तम वेळ घालवाल.
नोकरी/व्यवसाय :
या आठवड्यात मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्यांना आयात- निर्यातीसारख्या कामात उत्तम लाभ मिळू शकतो. रीयल इस्टेट, शेती वा त्यासंबंधित कामे, वाहनांची खरेदी-विक्री, सरकारी व कायद्याची कामे इ.त प्रगतीसाठी प्रयत्न वाढवायला हवेत. कामानिमित्त प्रवास घडेल.
नातीगोती :
या आठवड्यात संबंधांबाबत तुम्हाला थोडे सावध राहायला हवे. सुरुवातीच्या काळात स्वत:च्या बोलण्यावर ताबा ठेवावा. प्रियपात्राशी अहंकारावरून वादाची शक्य आहे. संबंधात अचानक स्थिती बदलण्याचीही शक्यता आहे. विवाहेच्छुक जातकांचे लग्न ठरण्यास विलंब लागू शकतो.
आरोग्य :
नाक, कान, घशाची जुनी तक्रार असेल तर या आठवड्यात त्याच्या उपचारांकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मानसिक त्रास, ब्लडप्रेशर, पाठदुखी, दात व हिरड्यांची समस्या, घशात जळजळ इ.ची शक्यता  असेल. तरीही पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्धात आरोग्य उत्तम राहील..
शुभदिनांक : ०९, १३, १४
शुभरंग : पिवळा, लाल, मरून
शुभवार : रविवार, सोमवार, मंगळवार
दक्षता :
या आठवड्यात कोणतेही नवे काम सुरू करू नये. बाहेरचे खाणे- पिणे टाळावे.
उपाय :
या आठवड्यात आर्थिक फायद्यासाठी पिंपळाची पाच पाने घेऊन त्यावर पिवळे चंदन लावावे व ती नदीत वा वाहत्या पाण्यात सोडावी. यामुळे आर्थिक संकट दूर होईल.