कन्या

09 Aug 2020 10:40:50
 
dfdfdf_1  H x W
 
या आठवड्यात तुमची जीवनशैली अस्ताव्यस्त राहील. कामे खूप त्रासानंतर पूर्ण होतील. उच्च अधिकाऱ्यांसोबत वाद होण्याशी शक्यता  आहे. त्यावेळी स्वत:च्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. व्यापारात फायदा होईल. तुमचे कौटुंबिक जीवन सुखमय राहील.
नोकरी/व्यवसाय :
या आठवड्यात तुमची व्यावसायिक प्रगती खूपच उत्तम असेल. सेल्स मार्केटिंग, कन्सल्टिंग इ.शी संबंधित लोकांना उत्तम संधी लाभेल. सरकारी व कायदेशीर कामांसंबधित व्यक्तीही प्रगती करू शकतील. शेती व यांत्रिक कामे करणाऱ्या नोकरदारांना फायदा होईल.
नातीगोती :
तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत उत्तम वेळ घालवाल. जोडीदारालाही भरपूर वेळ देऊ शकाल. दूर राहणाऱ्या प्रियव्यक्तीसोबत कम्युनिकेशची शक्यता आहे. त्यावेळी तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये पारदर्शकता ठेवण्याची गरज आहे, अन्यथा तुमच्या बोलण्याचा गैरअर्थ काढला जाऊ शकतो..
आरोग्य :
या आठवड्यात एकंदरीतच तुमची तब्बेत उत्तम राहणार आहे. तरीही तुम्ही प्रवासात स्वत:च्या तब्बेतीकडे लक्ष द्यायला हवे. धाडसी कामे करणाऱ्या व स्पोर्ट्समधील जातकांनी मार लागण्यापासून सुरक्षित राहावे. अ‍ॅसिडिटी, तळपायांची जळजळ, डोळ्यांची जळजळ होण्याची श्नयता आहे.
शुभदिनांक : १०, १२, १५
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
दक्षता :
या आठवड्यात अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नये. तुमच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पूर्ण विचार करून निर्णय घ्या.
उपाय :
या आठवड्यात लक्ष्मीमातेच्या मंदिरात पाच नारळ वाहा व सर्वांना खोबऱ्याचा प्रसाद वाटा. एक नारळ स्वत:जवळ ठेवून तो वाहत्या पाण्यात सोडा.
 
Powered By Sangraha 9.0