डासांना दूर ठेवणारे फ्लाय ब्लॉकर उपलब्ध

Sandyanand    09-Aug-2020
Total Views |
 
cgcgcg_1  H x W
 
संध्यानंद.कॉम
पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे डेंग्यू, चिकुनगुणीया आणि झिका यासारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. डासांमुळे आजारी पडून जगभरात दरवर्षी सुमारे सव्वासात लाख जण मृत्युमुखी पडतात. डासांना दूर ठेवणारे फ्लाय ब्लॉकर हे इलेक्ट्रॉनिक क्लॉक मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहे. घड्याळासारखे मनगटावर बांधावयाचे हे उपकरण बॅटरीवर चालते. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर १५० तास ती सक्रिय राहते. फ्लाय ब्लॉकर हे वॉटरफ्रूफ आहे. त्याचा उपयोग लहान मुले, गभर्वती महिला आणि पाळीव प्राण्यांनाही होऊ शकतो. या उपकरणातून विशिष्ट प्रकारच्या ध्वनिलहरी निर्माण होतात. या लहरींमुळे डास आपल्या शरीरापासून दूर राहतात. डासांना न आवडणाऱ्या आवाजाच्या या लहरी असतात.