धनू

09 Aug 2020 10:40:52
 
dddddd_1  H x W
 
या आठवड्यात तुम्ही खूप उत्साही राहाल. विनाकारण हटवादी होऊ नका. विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेत उत्तम यश लाभेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. घरातील वातावरण सकारात्मक राहील. बऱ्याच काळापासून चालत आलेले घरगुती प्रकरण सोडवण्यास उत्तम काळ आहे.
नोकरी/व्यवसाय :
या आठवड्यात नोकरी वा व्यवसायात तुम्हाला नवे टार्गेट मिळू शकते. नोकरदारांची जागा बदलाची खूप शक्यता आहे. ऑफिसमध्ये एखादे नवे काम मिळू शकते. सरकारी व शासनासंबंधित कामे, मुद्रण, रसायन, बँकिंग, अर्थ, शिक्षण, मीडिया इ. त काम करणाऱ्यांना यशदायक काळ आहे..
नातीगोती :
या आठवड्यात तुम्ही प्रेमसंबंधात पुढे जाऊ शकता. तुमच्यामध्ये एक खास आकर्षण असेल. नव्या लोकांसोबत तुमचे संबंध मधुर होतील. जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवाल. तसा आठवड्याच्या मध्यात कामामुळे कुटुंबाला व जोडीदाराला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही.
आरोग्य :
या आठवड्यात तुम्ही तुमच्या तब्बेतीची विशेष काळजी घ्यायला हवी. मानसिक अस्वस्थता, सुस्तीमुळे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही थोडे त्रस्त राहाल. मोठ्या आजाराने पीडित व्यक्तीच्या वेदना वाढू शकतात. अचानक आघात, रक्तासंबंधित समस्या होण्याची शक्यता आहे.
शुभदिनांक : ०९, १३, १४
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
शुभवार : रविवार, सोमवार, मंगळवार
दक्षता :
या आठवड्यात तुम्ही हुशारीने नाती जोपासायला हवीत. संचित धनाची देखभाल व्यवस्थित करावी.
उपाय :
एखाद्या पवित्र नदी वा सरोवरातील पाणी काचेच्या भांड्यात भरून दुकानाच्या देव्हाऱ्यात ठेवा. तसेच कार्यसिद्धी यंत्र तुमच्या घरात ठेवावे.
Powered By Sangraha 9.0