तूळ

Sandyanand    09-Aug-2020
Total Views |
 
ccgcg_1  H x W:
 
या आठवड्यात काम करताना घाईगडबड करू नये. धीराने काम करावे. तडकाफडकी कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. व्यापारात यश मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक लाभ होईल. मान-प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात सुखसमृद्धी येईल. संततीसुख लाभेल. एकंदरीत आठवडा आनंदात जाईल .
नोकरी/व्यवसाय :
हा आठवडा व्यावसायिक प्रगतीसाठी सावध राहण्याचा आहे, कारण आपल्याला बाजारात प्रतिस्पर्धकांचा सामना करावा लागणार आहे. तुम्हाला बेकायदेशीर व्यावसायिक व्यवहारातून बाहेर पडावे लागेल.
नातीगोती :
या आठवड्यात संबंधात काहीशा अहंकारामुळे तणावाची स्थिती राहणार आहे. विवाहितांच्या जोडीदाराच्या स्वभावात राग राहील. या स्थितीत आपल्या वागण्या-बोलण्यावर नियंत्रण ठेवायला हवे. कामावर विशिष्ट व्यक्तीशी चांगले वागून प्रगतीचा मार्ग सुकर करू शकाल .
आरोग्य :
या आठवड्यात तुमचे आरोग्य उत्तम राहील. उत्तरार्धात पचनासंबंधित समस्या वा मोसमी समस्यांचा परिणाम होऊ शकतो. याशिवाय ज्यांच्या छातीत कफ वा वेदना असतील वा सर्दीखोकला असेल त्यांनी उपचारात अजिबात निष्काळजीपणा राखू नये. अखेरच्या दोन दिवसांत स्थिती सुधारेल.
शुभदिनांक : १०, १२, १५
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
दक्षता :
या आठवड्यात कोणालाही स्वत:च्या विचारात बांधण्याचा प्रयत्न करू नये. प्रथम आपल्या माणसांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा विचार करावा.
उपाय :
कर्जमुक्त होण्यासाठी संध्याकाळी लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरात जावे व तेथील पाणी एका भांड्यात भरून आणावे. ते पिंपळाच्या मुळाशी वाहावे. तसेच वडाच्या पानावर कणकेचा दिवा लावून पाच मंगळवारी मारुती मंदिरात ठेवावा.