पृथ्वीच्या केंद्रस्थानी असलेल्या बळाला गुरुत्वाकर्षण म्हणतात. गुरुत्वाकर्षणाचं बळ हे त्या वस्तूच्या वजनावर अवलंबून असते. वस्तुचं वस्तुवान हे तिच्या वजनामुळे तिला मिळतं. न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. त्याची कथा अशी की, एकदा न्यूटन झाडाखाली बसला होता. तेव्हा त्याच्या डोक्यावर सफरचंद पडलं. न्यूटनला प्रश्न पडला की, सफरचंद खालीच का पडत? वर का जात नाही? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. वस्तुमान असलेली कोणतीही वस्तू पृथ्वीच्या केंद्रस्थानी खेचली जाते, ती गुरुत्वाकर्षणामुळे. गुरुत्वाकर्षण हे फक्त पृथ्वीवरच परिणामकारक नाही, तर त्याचा परिणाम इतर ग्रहताऱ्यांवरही होतो. चंद्राच्या पृथ्वीभोवतालच्या कक्षेवरही गुरुत्वाकर्षणाचा परिणाम दिसून येतो.