मॉल मध्ये जाताय?... ही खबरदारी घ्या आणि मगच खरेदी करा

Sandyanand    07-Aug-2020
Total Views |
 
sdfg_1  H x W:
 
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन बहुतांश शिथिल करण्यात आला आहे. आता मॉल आणि हॉटेलही सुरू होत आहेत. खरेदीप्रेमी आणि खाद्यप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट असली, तरी सर्वांनी सुरक्षित वावराच्या सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा आपण आपल्या आणि इतरांच्या जीवालाही धोका निर्माण करू शकतो. मुंबईमध्ये कुर्ला, लोअर परेल आदी भागांमध्ये मॉल सुरू झाले आहेत आणि त्यांनी सुरक्षेची सर्व काळजीही घेतली आहे. मात्र, खरेदीदारांनीही काळजी घेणे आवश्यक आहे .
 
अशी काळजी घ्या...
 
-मॉलच्या प्रवेशद्वाराजवळील यूव्ही स्कॅनरच्या साह्याने हातातील पिशव्या, पायात घातलेल्या चपला आदी सॅनिटाइझ करून घ्या. -आरोग्य सेतू डाऊनलोड करून घ्या आणि ते मॉलच्या प्रवेशद्वाराजवळ दाखवा. सुरक्षित वावराचे सर्व नियम पाळा. विशेषतः एस्कलेटरचा वापर करताना एकमेकांमध्ये पुरेसे अंतर राहील, याची काळजी घ्या; तसेच बिलिंग करताना काउंटरवर गर्दी करू नका.
-मॉलमधील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचना पाळा. ट्रायलसाठी ठेवलेल्या कपड्यांनाच हात लावा. कारण ते वापरल्यानंतर सॅनिटाइझ केले जातात.
-कॉन्टॅक्टलेस पेमेंट पद्धतीचा वापर करता येत असेल, तर जरूर करावा. मास्क, ग्लोव्हज् टाकून द्यायचे असतील, तर ते मॉलमधील कचऱ्याच्या पेटीत टाका.
-मॉलमधील फूड कोट सतत सॅनिटाइझ केले जात असले, तरी तुम्ही तुमच्याजवळ सॅनिटाझरचा एक स्प्रे अवश्य ठेवा. खरेदी केल्यानंतरही तुमच्याकडच्या पिशव्या सॅनिटाइझ करायला विसरू नका.
-मॉलमध्ये असताना पूर्ण वेळ मास्क घातलेला असेल, याची काळजी घ्या.