अमेरिकेत कारमध्ये रिअरव्ह्यू बसविण्याची सक्ती

06 Aug 2020 10:58:54
 
esdfg_1  H x W:
 
न्यूयॉर्क, ५ ऑगस्ट (वि.प्र.) : बहुतेक रस्ते अपघात वाहन (रिव्हर्स) मागे घेताना होतात. त्यामुळे अमेरिकन सरकारने वाहने विशेषतः कारमध्ये 'रिअरव्ह्यू कॅमेरा' बसविणे सक्तीचे केले आहे. भारतातही सर्व कारमध्ये एअर बॅग, रिव्हर्स पार्किंग सेंसर बसविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. परंतु 'रिअरव्ह्यू कॅमेरा' संदर्भात अद्याप विचाराधीन आहे. तब्बल ४ वर्ष वाहतूक सुरक्षा मोहीम राबविल्यानंतर ही व्यवस्था करण्यात आली. ४५३५ किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या वाहनांमध्ये रिअरव्ह्यू कॅमेरा बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यात कार, ट्रक, बसचा समावेश आहे. या रिअरव्ह्यू कॅमेऱ्यामुळे ड्रायव्हर वाहन मागे घेताना तो परिसर, स्थिती पाहू शकेल व अपघात होणार नाही. कारमागे ब्लाइंड झोन असेल तर त्याचीही ड्रायव्हरला माहिती मिळेल. बहुतेक युरोपियन देशात वाहनांच्या मागची जागा कशी आहे, याची माहिती दर्शविणारा रिअरव्ह्यू कॅमेरा बसविणे सक्तीचे आहे. भारतात वाहन अपघातात दरवर्षी कमीत कमी दीड लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यु होतो, तर अनेक लोकांच्या अपघाती मृत्युचे कारण वाहनांची ओव्हर स्पीड असते. देशात दररोज, निरनिराळ्या भागात सरासरी ४०० लोकांचा मृत्यु होतो. बहुतेक देशांमध्येही अशीच स्थिती असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे.
Powered By Sangraha 9.0