आता बर्लिन शहरात 'कोरोना लाइव्ह कॉन्सर्ट'

Sandyanand    06-Aug-2020
Total Views |
 
kjhg_1  H x W:
 
बंदिस्त जागेतील कार्यक्रमाच्या परिणामांचा अभ्यास करणार.
 
बर्लिन, ५ ऑगस्ट (वि.प्र.) : गर्दी करू नका कोरोनाची बाधा होईल असे WHO पासून, तर सर्व डॉक्टर्स सांगत असतात. परंतु, कोरोना कसा पसरतो हे जगातील बहुसंख्य लोकांना माहितीच नाही. त्यामुळे जर्मनीतील बर्लिन या शहरात 'कोरोना लाइव्ह' चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी लोकांना 'गर्दी करू नका' असे आवाहन करणारे प्रशासनच लोकांची गर्दी जमविणार आहे. या लाइव्ह कॉन्सटमध्ये बंद खोलीत कोरोना कोणकोणत्या वस्तूंमुळे पसरतो? अशा वेळी बंद स्टेडियममुळे किंवा थिएटरमध्ये मनोरंजन कार्यक्रम आयोजित करणे योग्य आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यासाठी बर्लिन येथील माटिन ल्युथर किंग विद्यापीठाच्या संशोधकांनी येत्या २२ ऑगस्ट २०२० रोजी लेपजिंग येथे 'कोरोना लाइव्ह कॉन्सट' आयोजित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या लाइव्ह कॉन्सटसाठी लोकांनी गर्दी करावी यासाठी प्रख्यात गायक 'बेंद्जको आणि पाटी'चा संगीत कार्यक्रम सुद्धा  आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात कमीत कमी ४००० लोक उपस्थित राहावेत, अशी योजना आखण्यात येत आहे. आत्तापर्यंत ८७८ लोकांनी या लाइव्ह कॉन्सटमध्ये सामील होण्याची इच्छा व्य्नत केली आहे. या लाइव्ह कन्सटसाठी ११.४ लाख डॉलर (भारतीय चलनात ७ कोटी ९८ लाख रु. खर्च करण्यात येणार आहेत. याप्रसंगी डॉ. स्टिफन मॉरित्ज यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांची  टीम आधुनिक सेंसर युक्त नेकलेसद्वारे लोकांची तपासणी करणार आहेत. यामुळे लोकांमध्ये किती सोशल डिस्टन्स आहे व त्यांच्यात संपर्क होण्याची कितपत शक्यता , तसेच शरीराचा सर्वांत जास्त स्पर्श होणारा अवयव शोधण्यात येणार आहे. यासाठी 'फ्लुरोसेंट सॅनिटायझर' वापरण्यात येईल. सर्वांत जास्त स्पर्श होणारा अवयव स्क्रीनवर दिसेल. या लाइव्ह कन्सटमध्ये सामील होणाऱ्या लोकांची ४८ तास अगोदर तपासणी करण्यात येईल.