सध्या देशात 124 अभिमत विद्यापीठे

30 Aug 2020 10:40:21

sdfgfh_1  H x W
 
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट (वि.प्र.) ः विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या माहितीनुसार सध्या देशात 124 डीम्ड युनिव्हर्सिटीज (अभिमत विद्यापीठे) आहेत. पण बऱ्याच लाेकांना डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे नेमके काय, हेच माहीत नाही.डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे युजीसी अ‍ॅ्नट1956च्या कलम 3 अन्वये डीम्ड विद्यापीठ दर्जा देण्यात येताे. हा दर्जा असे विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्था दिला जाते ज्या शिक्षण संस्था एखाद्या विशिष्ट क्षेत्रात उच्च पातळीवर काम करतात. या विद्यापीठांना इतर विद्यापीठाप्रमाणे अकॅडमिक स्टेटस सुविधा मिळतात. या साेबतच काेर्सेस, सिलॅबस, अ‍ॅडमिशन आणि फी निश्चित करण्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असते. जर या शैक्षणिक संस्था उत्तम काम करीत असतील तर त्यांना विद्यापीठाचा दर्जा दिला जाऊ शकताे. हा दर्जा मिळविण्यासाठी इन्स्टिूट्यूटला अनेक कसाेट्या पूर्ण कराव्या लागतात. त्यात कमीत कमी दाेन वर्षे एनआयआर (अटल रॅंकिंग ऑफ इन्स्टिट्युशन्स ऑन इनाेव्हेशन अचिव्हमेंट) रॅंकिंगमध्ये विशिष्ट श्रेणीत टाॅप-50 किंवा टाॅप200 यादीत स्थान मिळवणे आवश्यक असते.याशिवाय रेग्युलर प्राेग्रॅममध्ये 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी असणे आवश्यक आहे. या दृष्टीने यावर्षी अटल रॅंकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनाेव्हेशन अचिव्हमेंट अंतर्गत यावर्षी (2020) खासगी डीम्ड टुबी युनिव्हर्सिटीज श्रेणीमध्ये भुवनेश्वर येथील कलिंग इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल टे्ननाॅलाॅजीला प्रथम स्थान मिळाले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0