चिंतामुक्त राहायचेय? मग हे सात उपाय करून पाहा

03 Aug 2020 10:35:21
अतिविचारातून काही साध्य होत नसल्याने असे विचार करणे बंद करा
 
123_1  H x W: 0
 
 
ताणतणावांतून चिंता वाढते आणि त्याचा परिणाम केवळ मानसिक नाही तर शारीरिकही होतो. कशातही लक्ष न लागणे, औदासीन्य येण्यासारखे दुष्परिणाम होतात. पण, केवळ चिंता करून काही साध्य होत नाही. त्यातून बिघडते ती मन:शांती. त्याचा फटका बसतो तो आपल्या निर्णयक्षमतेला. काही उपायांनी चिंता करण्याची वृत्ती खूप कमी करता येते. चिंता कमी झाल्याने मेंदूला आराम मिळून तणावही कमी होतो. चिंतामुक्त राहण्यासाठी तज्ज्ञांनी सात उपाय सुचविले आहेत. ते अमलात आणा आणि आयुष्य आनंदाने जगा..
 
संध्यानंद.कॉम
१)चिंतेचे कारण ओळखा -
प्रत्येकाला कशाची ना कशाची काळजी असतेच. त्यामुळे अस्वस्थता येऊन मनात केवळ भीतीदायक विचार येत राहतात. हे अयोग्य आहे. आपल्याला नेमकी कशाची चिंता वाटते हे नक्की ओळखायला हवे. अशा वेळी वस्तुस्थितीचा विचार करून निर्णय करावयाचा असतो. त्यासाठी कोणत्या स्थितीची किंवा कोणत्या लोकांपासून आपल्याला चिंता वाटते हे जाणून घ्या. ती कोणत्याही प्रकारची असू शकते. अगदी दिलेले काम पूर्ण करण्यापासून ते शेजाऱ्याचा कुत्रा अथक भुंकत असल्यापर्यंत . आता तुम्हाला चिंतेचे कारण समजले असल्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक विचार मनात आणा, काही वेगळी कृती करा. उदा. रात्री तुम्हाला झोप येत नसेल, तर काही मिनिटे संगीत ऐका किंवा टीव्ही बघा. चिंतेबाबत सतत विचार करण्यापेक्षा अशा वेगळ्या कृतींमुळे तुम्ही चिंता काही काळ तरी विसरता आणि दरम्यानच्या काळात त्यावर मात करण्याचा मार्गसुद्धा लक्षात येऊ शकतो.
२) अतिविचार नकोच -
कशाची तरी चिंता किंवा काळजी वाटणे सहाजिक असले तरी त्याचा अतिविचार धोक्याचा ठरू शकतो. सतत काळजी करत राहिल्यास त्या समस्येचे रूप अकारण वाढते. विचार ही अखंड चालणारी प्रक्रिया असल्यामुळे एकदा चिंतेचे विचार मनात घुसल्यावर ते थांबविणे अवघड होते. त्यामुळे चिंतेबाबत अतिविचार करणे आधी थांबवा. त्यातून ताण आणखी वाढतो. त्याऐवजी काळजी दूर करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा.
३) काहीतरी विनोदी विचार करा -
मन विचलित होणे ही वाईट गोष्ट असल्याचे मानू नका. तुम्हाला कशाची चिंता वाटत असेल तर अशावेळी मनात काही तरी छान किंवा चक्क विनोदी विचार आणल्याने तुम्हाला त्रासदायक ठरणाऱ्या चिंता दूर होतात. मानसोपचाराच्या क्षेत्रात झालेल्या एका अभ्यासात हे दिसून आले आहे. त्यात सहभागी झालेल्यांना दुसरा पर्याय देईपर्यंत ते एकाच घटनेचा विचार करत होते. सहभागींनी पांढऱ्या रंगाच्या अस्वलाचा विचार करू नये असे त्यांना सांगण्यात आले होते. आणि परिणाम काय, तर सहभागी त्याचाच विचार करत होते. दुसरा पर्दियाय ल्यावरच त्यांनी त्याचा विचार सुरू केला. म्हणजे, दुसरा विचार केला तर चिंता दूर होतात. चिंता दूर करण्यासाठी कोणता विनोदी विचार करावा याला अंत नाही. आपल्या इच्छेप्रमाणे तो करा आणि चिंतेला पळवून लावा. कधीही काळजी किंवा चिंता वाटली, तर एखादा विनोदी विचार केलात तर तुम्ही काळजीमुक्त राहू शकाल.
 
 
 चिंतेचे कारण ओळखून मनात सकारात्मक विचार आणणे योग्य.
 
 
४) स्वत:लाच प्रश्न विचारा -
चिंतेचे कारण अनेकदा आपल्या वर्तणुकीत असते. सध्याच्या स्थितीत अकारण चिंता करत बसण्याने मला काय मिळणार आहे, असा प्रश्न स्वत:ला विचारा. काळजी दूर करण्याचा काही उपाय त्याक्षणी समोर नसेल तर व्यर्थ मन:शांती गमाविण्यात काय अर्थ, हाही प्रश्न स्वत:ला करा. या प्रश्नांची उत्तरे तुमची तुम्हाला मिळतील आणि सध्या चिंता करून काही साध्य होणार नसल्याने दुसरा मार्ग शोधावा, असे तुमच्या लक्षात येईल. व्यर्थ चिंता करण्यामुळे थकवा येतो, राग वाढतो आणि शेवटी नैराश्य येते. याचाच अर्थ अतिकाळजी, अतिविचारांतून काहीही साध्य होत नाही.
५) स्वत:च्या विचारांबाबत दक्ष राहा -
आपण कसे विचार करतो यावर बरेच काही अवलंबून असते. मन शांत ठेवण्यासाठी आणि चिंता दूर करण्यासाठी विचारपूर्वक किंवा सावधपणाने केलेली ध्यानधारणा उपयुक्त ठरत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी आता मान्य केले आहे. चिंता दूर करण्यासाठी अधूमधून अल्पकाळ सावधपणाने ध्यानधारणेचा मार्ग अवलंबिल्यास फायदा होतो. डोळे बंद करून शरीराचा विचार करा आणि शरीरात कोठे तणाव आहे, वेदना आहेत हे पाहा. खोल श्वास घेऊन या चिंता श्वासाबरोबर जोडण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक खोल श्वासाबरोबर या चिंता कमी होत असल्याची कल्पना करा. हा उपाय बराच उपयुक्त ठरतो. अर्थात तुमचे विचार चांगले आणि सकारात्मक असतील तर चिंताही कमी होतील.
६) 'चिंतेची जागा' शोधा -
ही संकल्पना प्रथम विचित्र वाटेल; पण ती आहे. कारण आपल्या मेंदूमध्ये मानसिक स्थिती आणि स्मृती किंवा आठवणी एका विशिष्ट भागात असतात. त्याचप्रमाणे चिंता वाटत असेल, तर विचार करण्यासाठी घरात किंवा बाहेर एखादी विशिष्ट जागा तुम्ही निश्चित करू शकता.चिंतेचे कारण ओळखून मनात सकारात्मक विचार आणणे योग्य.
 
Powered By Sangraha 9.0