समूहात रमणारा सातभाई पक्षी

19 Aug 2020 12:39:10

dfsdf_1  H x W:
या पक्ष्याचे कपाळ राखाडी रंगाचे आणि संपूर्ण शरीर तपकिरी रंगाचे असते. हा पक्षी उडत असताना फुलवलेल्या शेपटीची बाहेरची पिसे पांढरट दिसतात. त्याचे शेपूट लांबसडक असून त्याची मधली पिसे सर्वात लांब आणि कडेची पिसे लहान असतात. सातभाई नेहमी सातच्या संख्येत दिसतात, म्हणून हा सातभाई पक्षी नावाने ओळखला जाताे. सातभाई कधी कधी 8-10 तसेच 20-22 च्या समूहातही दिसतात. हे पक्षी छाेट्या थव्यांमध्ये विखुरले असतात.चीं चीं आवाज करत जमिनीवरचे किडे खातात. वाळव्या, अळ्या आणि गवताच्या बिया हे त्यांचा मुख्य आहार असताे. थव्यातला एक पक्षी झाडावर बसून टेहळणीचे काम करताे.एखादा शिकारी पक्षी दिसला की विशिष्ट आवाज करून जमिनीवर खाद्य शाेधत असणाऱ्या पक्ष्यांना सावध करताे. धाे्नयाचा इशारा मिळताच जमिनीवरचे सर्व पक्षी ताबडताेब जवळच्या एखाद्या झाडावर किंवा झुडपात दडून बसतात.झाडावर बसून टेहळणी करण्याचे काम थव्यातले पक्षी आलटून पालटून करतात.याला इंग्लिशमध्ये लाॅर्ज ग्रे बॅबलर असे नाव आहे.
 
Powered By Sangraha 9.0