चिनी महिलेच्या पोटाचे वजन १९ किलो !

Sandyanand    13-Aug-2020
Total Views |
 
ascad_1  H x W:
 
विचित्र आजाराच्या विळख्याने झाली आहे बेजार.
 
बीजिंग, १२ ऑगस्ट (वि.प्र.) : चीनमधील हुआंग गुओशियान या महिलेचं नाव सध्या जगभर चर्चेत आहे. हुआंगला अशा काही आजारानं विळखा घातलाय की ज्याची कुणी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. हुआंगला दोन वर्षांपासून पोट वाढण्याच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या केवळ पोटाचंच वजन १९ किलोवर जाऊन पोहचलं आहे. हुआंग आपल्या आजाराबद्दल सांगते की, माझं वजन ५४ किलो असून यातील ३६ टक्के भाग माझ्या पोटाचा आहे. मागील दोन वर्षांपासून या आजाराचा मला त्रास होतोय. घराच्या बाहेर पडलं तर हे भलमोठं पोट पाहून लोक मला गर्भवती महिला समजतात. एवढंच नव्हे तर पोटाच्या वाढत्या आकारानं तिला रात्रीची झोप घेणंदेखील अशक्य झालं आहे. यामुळे हुआंगचा हावभावही चिडचिडा झाला आहे. मात्र तिची परिस्थिती बेताची असल्यानं तिला चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करणं देखील शक्य नसल्याचं हुआंगचं म्हणणं आहे. हुआंगला केवळ पोटाचाच आजार नव्हे तर लिवर सिरोयसीस, ओवेरियन कॅन्सर आणि बिनाइन ट्युमर सारख्या दुर्मिळ आजारांनीही ग्रासलं आहे. मात्र तिच्या पोटाचा आकार दिवसागणिक का वाढत चालला असावा, याचा शोध अद्याप डॉक्टरांनाही लागलेला नाही.