घारापुरी बेट

13 Aug 2020 11:54:17

Sdaf_1  H x W:  
 
पोर्तुगीज घारापुरी बेटावर उतरले, त्या वेळेस तिथे असलेल्या हत्तींच्या दोन मोठ्या शिल्पाकृतींवरून या बेटाला त्यांनी 'एलिफंटा' असे नाव दिले. त्यातील हत्तीची एक शिल्पाकृती समुद्राच्या तळाशी आहे, तर दुसरी सध्या भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आहे.
 
घारापुरीची लेणीबद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असेल. मुंबईपासून जवळ असलेल्या घारापुरी येथील शैव लेणींना जागतिक वारसा दर्जा मिळालेला आहे. घारा म्हणजे गुरव आणि पुरी म्हणजे नगर. शिवमंदिरातील पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांना पूर्वी गुरव या नावाने संबोधलं जायचं. अशा गुरव पुजाऱ्यांची वस्ती असलेलं नगर म्हणून त्याला 'घारापुरी' असं नाव पडलं. पोर्तुगीज घारापुरी बेटावर उतरले त्या वेळेस तिथे असलेल्या हत्तींच्या दोन मोठ्या शिल्पाकृतींवरून या बेटाला त्यांनी 'एलिफंटा' असे नाव दिले. त्यातील हत्तीची एक शिल्पाकृती समुद्राच्या तळाशी आहे, तर दुसरी सध्या भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. राजबंदर, शेतबंदर आणि मोराबंदर अशा तीन महत्त्वाच्या वस्ती घारापुरी बेटावर तीन दिशांना आजही पाहायला मिळतात. मोराबंदर परिसरातील टेकडीवरच घारापुरी येथे मोठ्या बौद्ध स्तूपाचे अवशेष आजही पाहता येतात. या बेटावरील डोंगरात पाच लेणी खोदलेली आहेत. येथील शिल्पकाम शैव संप्रदायाचे आहे. त्यात अनेक शिवकथा कोरलेल्या दिसतात. या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिव-पार्वती विवाह,गंगावतरण, तांडवनृत्य, अंधकासुर वध इ. दृश्ये अतिशय सुंदर असून, शिवाची गोष्ट आपल्याला त्यातून कळते.
Powered By Sangraha 9.0