कोकणातील वीजदुरुस्ती कामांचा आढावा

13 Aug 2020 11:54:20
 
sss_1  H x W: 0
 
मुंबई, १२ ऑगस्ट (आ.प्र.) : गणेशोत्सवाच्या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण भागात चोवीस तास वीजपुरवठा करण्यात यावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले. महावितरणच्या फोटमधील कार्यालयात डॉ. राऊत आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत, तसेच कोकण विभागातील विजेच्या कामांसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यात डॉ. राऊत यांनी हे निर्देश दिले. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे २२ केव्ही स्विचिंग उपकेंद्र करण्यासंदर्भात २८०० चौरस मीटरची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, श्रीवर्धन तालुक्यात अतिउच्चदाब (ईएचव्ही) उपकेंद्र उभारल्यास दिघी बंदरासाठी ते फायदेशीर ठरू शकेल. रोहा तालुक्यात आरएसजे पोल्सची आवश्यकता आहे. तळा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता सुरळीत वीजपुरवठ्यासाठी भोगोलिकदृष्ट्या मोठ्या शाखा कार्यालयाची विभागणी दोन शाखांत करण्यासंदर्भातही कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश डॉ. राऊत यांनी दिले.
Powered By Sangraha 9.0