तत्त्वज्ञ आणि धर्मसंस्थापक गौतम बुद्ध

Sandyanand    13-Aug-2020
Total Views |
 
cgcggc_1  H x W
 
गौतम बुद्ध हे तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक होते. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व राणी महामाया(मायादेवी) यांचा तो पुत्र, राजकुमार सिद्धार्थ. सिद्धार्थ यांच्या आईच्या निधनानंतर त्यांची मावशी गौतमी यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थ यांना गौतम या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ यांचा राजकुमारी यशोधरा यांच्याशी विवाह झाला. त्यांना राहुल नावाचा पुत्र झाला. गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले. कठोर तपस्या केली. बिहार येथील गया येथे निरंजना नदीच्या काठी एका पिंपळवृक्षाखाली ते ध्यानस्थ असताना एका वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला बुद्ध असे ओळखले जाऊ लागले. बुद्ध ही एक ज्ञानाची अवस्था आहे. बुद्ध म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना ज्या पिंपळाच्या झाडाखाली बुद्धत्व प्राप्त झाले त्या झाडाला बोधीवृक्ष असे संबोधले जाते. बोधीवृक्ष म्हणजे ज्ञानाचा वृक्ष. बुद्धांनी उत्तर प्रदेशमधील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास धम्मचक्रप्रवर्तन असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्माचा अधिक प्रसार झाला.