मधुमेहींनी रिकाम्या पोटी राहू नये, ठरावीक काळाने थोडे थोडे खात राहावे

12 Aug 2020 11:03:11
 sss_1  H x W: 0
 
दिवसातून तीन वेळा पोटभर संतुलित आहार घेण्याचा राहूलचा नियमच त्याला ब्लडशुगर होण्यास कारणीभूत ठरला. राहूलच्या डॉक्टरांनी  त्याला सांगितले की, तीन वेळा पोटभर जेवण्याऐवजी थोड्या प्रमाणात खाण्याचा व स्नाक्स  घेण्याचा नियम करावा. दिवसातून तीनदा खाल्ल्यामुळे अचानक जास्त प्रमाणात ब्लडशुगर उत्पन्न होते. कमी प्रमाणात ठराविक काळानंतर मिश्रित कार्बोहायड्रेट व जास्त आहारीय तंतुयुक्त स्नाक्स खाणे मधुमेहींसाठी आवश्यक असते. भरपूर खाल्ल्यानंतर मधुमेहग्रस्त लोकांमध्ये ब्लडशुगर अचानक वाढू शकते. जेवल्यानंतर वाढणाऱ्या ब्लडशुगरला पोस्टप्रेंडियल हायपरग्लायसीमिया म्हणतात. या स्थितीत धमण्या क्षतिग्रस्त होऊ शकते. ज्यामुळे हृदयविकार, किडनी विकार, डायबिटीक की टोअ‍ॅसिडोसिस आणि डायबिटीक फुट होण्याची शक्यता  वाढते. याउलट जेवणांमध्ये खूप जास्त अंतर असेल तर ब्लडशुगरची पातळी एकदम घसरते. ज्याला हायपोग्लायसीमिया म्हणतात. यामुळे सर्व पेशी, विशेषत: मेंदूचा ऊर्जापुरवठा बंद होतो. यामुळे रुग्ण डायबिटिक कोमात जाऊ शकतो एवढेच नव्हे तर त्याचा मृत्यूही होऊ शकतो. ब्लडशुगरमध्ये कमालीची चढ-उतार होणे सातत्याने उच्च ब्लडशुगर असण्यापेक्षाही वाईट स्थिती आहे. उच्चरक्तशर्करा सूचकांकयुक्त आहार वा साधे कार्बोहायड्रेट सेवन ब्लडशुगर अचानक वाढवू शकते. उच्च रक्तशर्करा सूचकांक ज्यामुळे रक्तात शुगरचे प्रमाण अचानक वाढते असे खाद्यपदार्थ असतात. त्यामध्ये साधे कार्बोहायड्रेट असते व ते लवकर तुटते. त्याचा ग्लुकोज इंडेक्स ही  जास्त असतो. त्यामुळे रक्तात शुगर खूपच चटकन वाढते. जेव्हा एखादी डायबिटीक व्यक्ती आजारी पडते (उदा. तीव्र ताप) तेव्हा तिची भूक मंदावू शकते. मधुमेही व्यक्तीने ठराविक काळाने थोडे थोडे खात राहायला हवे. त्यामुळे त्याची ब्लडशुगर नियंत्रणात राहील.
Powered By Sangraha 9.0