ऑफिसमध्ये काम करताना कान दुखते का?

12 Aug 2020 11:03:14
 
zcz_1  H x W: 0
 
ऑफिसमध्ये खूप वेळ काम केल्यानंतर मान आखडणे आणि वेदना होतात. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करत असताना चुकीच्या पद्धतीत बसण्याने मानदुखीसारख्या समस्या होतात. बऱ्याचदा कोपराला आधार मिळतच नाही, ते हवेतच असते. ज्यामुळे खांदा आणि मान यांच्या पेशी आकुंचन पावतात. यामुळे ससर्वोन्कल स्पॉंडिलाइटिससारख्या समस्या होतात. तज्ज्ञांच्या मते, काही जणांचा लॅपटॉप खूप जड असतो आणि अशा लॅपटॉपची बॅग ते खांद्यावर घेऊन खूप दूरचा प्रवास करतात. ज्यामुळे असंतुलनाची स्थिती निर्माण होते. यामुळे मान, खांदा, पाठीच्या पेशींमध्ये वेदना होतात. सुधारणा कशी कराल? तुम्ही दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा खांदे पुढे-मागे करण्याचा, कंबर-मान फिरविण्याचा व्यायाम करा. डोकं एका बाजूकडून दुसऱ्या बाजूस फिरवा. काही वेळ आकाशाकडे बघा. त्यानंतर रिलॅक्स व्हा.
Powered By Sangraha 9.0