यशासाठी निराशेवर मात करणे आवश्यक

12 Aug 2020 11:03:12
 sss_1  H x W: 0
 
यश मिळविण्यासाठी प्रयत्न तर आवश्यक असतातच, पण त्यासाठी निराशेपासून दूर राहणे हेही आवश्यक असते.
 
एकदा एका डोंगरकड्यावर चढण्याची शर्यत आयोजित करण्यात आली. स्पर्धकांना डोंगरकड्यावर चढताना पाहण्यासाठी खूपच गर्दी जमा झाली. प्रत्येक जण हे म्हणत होता की, 'ही तर खूपच सरळ उभी चढाई आहे. यावर चढणे तर अशक्य आहे.' काही स्पर्धक हे ऐकून वर चढलेच नाहीत, तर काही थोडे वर जाऊन खाली पडले आणि नंतर पुन्हा प्रयत्न केला नाही. त्यांना पाहून लोक आणखी जोराने ओरडू लागले की, ही स्पर्धा कोणी जिंकू शकत नाही. कारण या डोंगरकड्यावर चढणे अशक्य आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेले स्पर्धकही निराश झाले. पण त्यांच्यामध्येच एक स्पर्धक पुन्हा पुन्हा पडल्यानंतरही प्रयत्न करत राहिला आणि शेवटी त्या सरळ डोंगरकड्यावर चढला. त्याला विजेता घोषित केले गेले. तेथे उभ्या काही लोकांनी त्याला विचारले की, तू हे अशक्य  काम कसे केलेस? पण त्या स्पर्धकाने कोणत्याही प्रश्नाचे कोणतेही उत्तर दिले नाही. तेव्हा मागून एक आवाज आला, 'अरे त्याला काय विचारता, त्याला तर जन्मापासूनच काही ऐकू येत नाही.' निष्कर्ष: यश मिळविण्यासाठी नैराश्याने भरलेल्या नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करणे चांगले.
Powered By Sangraha 9.0