वुहान ध्ये बरे झालेल्या ९०% रुग्णांची फुफ्फुसे खराब

Sandyanand    10-Aug-2020
Total Views |
 
cdcdc_1  H x W:
 
वुहान (चीन), ९ ऑगस्ट (वि.प्र.) : जगाला भयानक कोरोना व्हायरस देणाऱ्या चीनच्या वुहान शहरात कोरोनाशीच संबंधित एक नवे संकट निर्माण झाले आहे. चीनच्या वुहान येथील लॅबोरेटरीतच कोरोना विषाणु तयार करण्यात आला. पण या विषाणूच्या प्रभावातून वुहान शहरही सुटले नाही. या शहरातील लोकांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. पण शेकडो लोकांचा मृत्यू झाल्यावर चीनने त्यावर मात केली व बहुतेक रुग्ण बरे झाले. पण आता बऱ्या झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९०% रुग्णांची फुफ्फुसे खराब झाल्याचे आढळून आल्यामुळे चीनमध्ये खळबळ माजली आहे. ज्या कोरोनाबाधितांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती ते इलाज केल्यानंतर बरे झाले. पण आता बऱ्या झालेल्या रुग्णांपैकी ९०% रुग्णांची फुफ्फुसे खराब झाल्याचे आढळून आल्याचे झोंगनान हॉस्पिटलचे निर्देशक डॉ. पेंग झियोंग यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर बरे झालेल्या रुग्णांपैकी ५% रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाली असून या सर्वांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. वुहानमधील एप्रिल महिन्यात बरे झालेल्या १०० रुग्णांवर पेंग झियोंग यांच्या अध्यक्षतेखाली एक टीम लक्ष ठेवून होती. या रुग्णांची वेळोवेळी तपासणी करण्यात आली होती. हे रुग्ण सरासरी ५९ वर्षांचे आहेत.