दु:ख लपवून जगाला हसवणारा चार्ली चॅप्लिन

Sandyanand    10-Aug-2020
Total Views |
 
ddddddddddd_1  
 
आज जगात चार्ली चॅप्लिनला ओळखत नाही असे कोणीही नाही. ज्याने संपूर्ण जगाला हसवले त्या चार्लीचे जीवन मात्र अतिशय दु:ख व संघर्षाने भरलेले होते.
 
इंग्लंडमधील एका अतिशय गरीब कुटुंबात १६ एप्रिल १८८९ रोजी चार्लीचा जन्म झाला. चार्लीचे आईवडील एका कंपनीत गायक आणि कलाकार म्हणून काम करीत होते. एकदा चार्लीची आई व्यासपीठावर गाणं सादर करत असताना त्यांचा आवाज अचानक बंद झाला. त्यामुळे प्रेक्षकांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. त्या गाऊ शकत नाहीत हे पाहून लोकांनी शिवीगाळ, फेकाफेक करायला सुरुवात केली. हे सर्व पाहणं असल झालेला ५ वर्षीय चार्ली चॅप्लिन त्यावेळी व्यासपीठावर आला व आपल्या आईचे अर्धवट गाणे आपल्या बोबड्या बोलात पूर्ण केले. प्रेक्षकांना त्याचे कौतुक वाटल्याने त्यांनी पैसे फेकायला सुरुवात केली. यामुळे चार्लीच्या ध्यानात एक गोष्ट आली की, या जगात तुमच्या दु:खाला काही स्थान नाही. या जगात माणसाची नाही तर त्याच्या कलेची किंमत होते. ही गोष्ट त्याला वयाच्या पाचव्या वर्षीच कळली. त्यानंतरच्या काळात त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. कमाईचे काहीच साधन नसल्यामुळे त्याला त्याच्या आईसोबत अनाथालयात राहावे लागले. सर्व बाजूंनी दु:खाने घेरल्यामुळे त्याच्या आईच्या मनावर परिणाम झाला व त्यांना मानसिक आजार झाला. त्यावेळी चार्लीवर दुःखचे आभाळच कोसळले. अशातच एक घटना घडली, कोटाने त्याच्या वडिलांना चार्ली आणि त्याच्या भावाची जबाबदारी घेण्याचे आदेश दिले. त्याला वाटले की आता स्थिती ठीक होईल. पण, त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. त्यामुळे त्याच्या सावत्र आईने दोन्ही भावंडांचा छळ मांडला. काही काळाने त्याची आई बरी होऊन हॉस्पिटलमधून परतणार होती व दोन्ही भावंडं पुन्हा आईसोबत राहायला जाणार होते. त्यानंतर त्यांनी शाळेत जायला पुन्हा सुरुवात केली. पण शाळेतील अभ्यासात चार्लीचे मन लागत नव्हते. त्यांना अभिनेता बनावेसे वाटत होते. त्यामुळे त्यांनी अभिनय करणे सुरू ठेवले. एकदा नाटकाच्या प्रयोगादरम्यान एका दिग्दर्शकाने त्याला बघितले. त्याच्या सांगण्यावरून हॅमिल्टनने चार्लीला शेरलॉक होम्स या नाटकात घेतले. पण तिथेसुद्धा अडचण होती, कारण चार्लीला वाचता येत नव्हते. त्यामुळे नाटकातील वाक्य त्याला ऐकून पाठ करावी लागत असे. पण त्याने हार मानली नाही व मेहनत करत राहिला व बघता बघता तो प्रसिद्ध झाला. १९५२ मध्ये बनलेल्या त्याच्या पहिल्या चित्रपटाला मात्र प्रतिबंधित करण्यात आले होते. परंतु तो अपयशामुळे खचला नाही. पुढे त्याच चित्रपटासाठी त्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला .