माणसाला अमरत्वाकडे नेणारी ११ तंत्र

Sandyanand    01-Aug-2020
Total Views |
आरोग्य_1  H x W
 
 
अमर होणे हे माणसाचं वेडं स्वप्न आहे. त्यात अनेक अडथळे आहेत हे माहीत असूनही माणूस या स्वप्नामागे धावत असतोच. या स्वप्नाच्या मार्गातील टेलोमेअर शॉर्टनींग सारखे अडथळे वैज्ञानिक स्वरूपाचे आहेत. मानवी शरीरातील एका गुणसूत्रापासून एकसारखी अनेक गुणसूत्रे तयार होतात. तशी ती तयार होत असताना त्यांचा आकार दरवेळी थोडा कमी होतो. ही प्रक्रिया टेलोमेराझ या एंझाइम वा संप्रेरकामुळे होते. काही विशिष्ट पेशींमध्ये हे एंझाइम आढळते. यामुळे पेशींचे अस्तित्व कायम राहते, पण त्यांचा आकार कमी होतो. यातून माणसाची वाटचाल वृद्धत्वाकडे होते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा दुसरा महत्त्वाचा वैज्ञानिक अडथळा. ऑक्सिजन असलेल्या रेणूंची निर्मिती आणि त्यांचे विषारी परिणाम टाळण्याची शरीराची क्षमता यांच्यात असमतोल निर्माण झाल्यास हा स्ट्रेस तयार होतो. ऑक्सिजनयुक्त रेणू अतिशय सक्रिय असतो. रक्तातील साखरेचे प्रमाण हादेखील असाच गुंतागुंतीचा वैद्यकीय प्रश्न आहे. त्यावरही माणसाचे वृद्ध होणे अवलंबून असते. माणसाला अमरत्वाकडे नेणाऱ्या ११ तंत्रज्ञानांची माहिती घेणे रंजक ठरेल.
१. चेतना देणारे रक्त संक्रमण ( Regenerative blood transfusions ) :         
 तरुण उंदरांमध्ये वैज्ञानिकांना विशिष्ट प्रकारचे प्रोटीन आढळले. त्याला त्यांनी GDF11 असे नाव दिले. या प्रोटीनचे प्रमाण वय जास्त असलेल्या उंदरांमध्ये अत्यंत कमी असते. GDF11 मुळे मेंदूच्या स्नायूंमध्ये वाढ होते आणि हृदयाची क्षमताही वाढते. या प्रोटीनची निर्मिती करता येईल का आणि ते रक्तात मिसळता येईल का, यावर संशोधन सुरू आहे. अशा प्रकारच्या प्रोटीनयुक्त रक्ताचे संक्रमण एखाद्या व्यक्तीच्या शरीरात केल्यास त्याचे आयुष्य १० ते २० वर्षांनी वाढू शकते, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.
२. वय वाढविणाऱ्या गोळ्या (Longevity pills) :
वृद्धत्वाची प्रक्रिया रोखणारी संप्रेरके मानवी शरीरात तयार करणाऱ्या गोळ्यांवर संशोधन चालू आहे. सरटुनीन १ (Sirtuin 1) या नावाने या गोळ्या वैद्यकीय क्षेत्रात परिचित आहेत. या गोळ्यांमुळे पंधरा ते वीस वर्षांनी माणसाचे आयुष्य वाढू शकते. एलिझिअम या कंपनीने या गोळ्या विकसित केल्या आहेत. गेली २५ वर्षे यासंबंधी प्रयोग करण्यात येत आहेत. आता या प्रयोगांची वाटचाल मानवी चाचण्यांपर्यंत झाली आहे. या गोळ्या लवकरच सर्वत्र उपलब्ध होतील.
३. नॅनोटेक्नॉलॉजी :
नॅनोटेक्नॉलॉजीमुळे अविश्वसनीय वाटणाऱ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. वैद्यकीय उद्योगक्षेत्रात या तंत्रज्ञानाने क्रांती होऊ शकते. नॅनो रोबोट्समध्ये स्वतःसारखे रोबोट्स निर्माण करण्याची क्षमता असते. या अतिसूक्ष्म रोबोट्सचा वापर कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी करता येतो. पेशींमधील काही सुधारणाही त्यांच्यामुळे होऊ शकतात.
४. वय वाढविणारी गुणसूत्रे :
वयाची शंभरी पूर्ण केलेल्या दोन मानवी गटांचा अभ्यास करण्यात आला. यापैकी एका गटात १५२ स्पॅनिश वृद्ध होते, तर दुसऱ्या गटात ७४२ जपानी वृद्धांचा समावेश होता. या दोन्ही गटांमध्ये काही गुणसूत्रे समान आढळली. यीस्ट वा आंबवलेल्या पदार्थांवरही जीन थेरपीचा प्रयोग करण्यात आले. गुणसूत्रांच्या तंत्रज्ञानाचा वापर करून २५ वर्षांनी आयुष्य वाढवता येते, असा निष्कर्ष या अभ्यासांमधून काढण्यात आला.
५. जीन थेरपी :
मानवी शरीरातील गुणसूत्रांची वाढ माणसाचे वय वाढत असतानाही होत असते. मानवी शरीराचे घड्याळ विशिष्ट लयीत चालू असते. पेशींमध्ये बदल घडवून या घड्याळाची गती कमी करण्याचे प्रयोग जीन थेरपीद्वारे करण्यात आले. उंदराच्या आयुष्यात २५ टक्क्यांनी वाढ करता येते, असे काही प्रयोगांमधून सिद्ध झाले.
६. मेटामटेरिअल बायोनिक्स :
मेटामटेरिअल म्हणजे कृत्रिमरीत्या अभियांत्रिकी प्रक्रियेतून तयार केलेला पदार्थ. कृत्रिम अवयव तयार करण्यासाठी, तसेच अवयवांची शक्ती वाढवण्यासाठी या पदार्थांचा वापर करता येऊ शकतो. यामुळे माणूस जास्त काळ जगतो. कानातील सदोष स्नायू वा हाडे बदलण्यासाठी मेटामटेरिअल बायोनिक्स तंत्राचा उपयोग करण्यासंबंधी संशोधन चालू आहे.
७. रोबोटिक अवतार :
मानवी शरीराच्या रचनेच्या अनेक कॉप्या वा प्रती तयार करून त्यांचा ऑनलाइन साठा करणे शक्य आहे. भविष्यात या कॉप्या एखाद्या रोबोटमध्ये इन्स्टॉल करता येतील.