नियमित योगासनं आपल्या सौंदर्यात नेहमीच भर घालतात...

Sandyanand    08-Jul-2020
Total Views |
 
abc_1  H x W: 0
 
 
सुंदर त्वचा, घाटदार शरीर, नाजूक काया, चमकदार केस आणि नैसर्गिक सौंदर्य हे सगळं मिळविण्यासाठी तरूणाई फिटनेस सेंटर, जिम, सलून, स्पा इत्यादीमध्ये गर्दी करताना दिसते. महागड्या सौंदर्य  प्रसाधनांचा वापरही केला जातो. मात्र हे सगळे लाभ केवळ योगासनं करण्याने मिळू शकतात. सौंदर्य  वाढविण्याता योगासनांची भूमिका महत्त्वाची आहे... दररोज सकाळ आणि संध्याकाळी अर्धा तास सूर्य नमस्कार, कपालभाती, धनुरासन आणि श्वासाशी संबंधित क्रियांच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनात सौंदर्य आणि नैसर्गिक आकर्षण टिकवून ठेवू शकतो.
 
त्वचा चमकदार होण्यासाठी...
सामान्यतः अनिद्रा, तणाव इत्यादीमुळे त्वचेवर मुरूम, काळे डाग येतात. यावर स्थायी उपचार म्हणून योगासनं करणं सहाय्यक ठरतं. उत्थान आसन नियमित करण्याने डाग, मुरूम यावर कायमचा उपाय होऊ शकतो. कपालभाती रक्त शुद्ध करण्यासाठी सहाय्यक ठरते. यामुळे शरीर हलकं वाटतं. धनुरासन करण्याने शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते. यामुळे शरीराच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येते. त्वचेचा रंग उजळतो.
 
शरीर आकर्षक बनवा
योगाच्या सततच्या अभ्यासाने त्वचा आणि शरीराचं तरूणपण दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास सहाय्य होतं. योगासनांमुळे म णक्याचं हाड तसंच सांधे लवचिक बनण्यास मदत होते. ज्यामुळे दीर्घकाळ शरीराची लवचिकता आणि आकर्षण टिकून रहातं. योगासनांमुळे शरीराचं वजन कमी करण्यास मदत होते. तसंच पेशी मऊ-मुलायम होतात. योगामुळे थकव्यापासून मुक्ती मिळते आणि शरीरात ऊर्जेचा संचार होतो. सूर्य नमस्कारांमुळे शरीरात नवयौवनाचा संचार होतो. सूर्य नमस्कारामुळे शरीरावर होत असणारा वयाचा परिणाम रोखता येतो.
 
सुरकुत्यांपासून मुक्ती
सुंदर दिसण्यासाठी तुम्ही सुंदर म्हणून जन्माला यायला हवं, असं अजिबात नाही. तुम्ही तुमच्या प्रयत्नांद्वारे सौंदर्य प्राप्त करू शकता. चांगलं आरोग्य आणि सौंदर्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर तुम्ही आंतरिकदृष्ट्या सुंदर नसल तर तुमच्या चेहऱ्यावरही सौंदर्य झळकणार नाही. सुंदर त्वचा, चमकदार केस आणि नाजूक काया यासाठी आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे.
 
योगामुळे वाढते प्राणशक्ती
योगामुळे नाडी तंत्र स्थिर ठेवण्यास मदत होते. यामुळे तणाव कमी होण्यास आणि मानसिक संतुलन टिकवून ठेवण्यास फायदा होतो. योगाचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे यामुळे श्वासावर नियंत्रण रहातं. योगाभ्यासादरम्यान श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे याच्या उचित क्रियेमुळे श्वास संयमित करण्यास मदत मिळते. यामुळे शरीरातील ऑक्सिजन नियंत्रित करण्यास मदत मिळते तसंच प्राणशक्ती वाढते.
 
मानसिक तणाव कमी होतो
अनेक सौंदर्य समस्या या मानसिक तणावामुळे निर्माण होतात. योगाद्वारे तणावाला कमी करण्यास आणि मानसिक स्थिती सुधारण्यात मदत होते. यामुळे तणावाशी संबंधित सौंदर्य समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. योगाच्या नियमित अभ्यासाने मुरूम, केस गळण्याची समस्या, केसांमध्ये कोंडा या समस्यांपासून मुक्ती मिळते. योग तसंच शारीरिक क्रिया करणाऱ्या तरूणांवर केलेल्या अध्ययनात आढळले की, या तरूणांमध्ये भावनिक स्थिरता, आत्मविश्वास, योग्य हावभाव यांसारखे सकारात्मक बदल दिसून आले.
 
मन स्थिर होते
धावपळीने ग्रस्त जीवनाला आज प्रत्येक जण सोपं बनवू इच्छित आहे. अशावेळेस आपण आपलं आयुष्य सुखी होण्यासाठी थोडासा वेळ योगाला देऊ शकत नाही का? जोपर्यंत मन शुद्ध किंवा स्थिर रहात नाही, तोपर्यंत शरीर अशुद्ध रहाते. योगाभ्यासाद्वारे तना-मनाची शुद्धी होते. आपलं तन-मन निरोगी होतं. योगाभ्यासाद्वारे तन आणि मन शांत ठेवता येतं.
 
केस आणि त्वचेचं सौंदर्य वाढते
केस आणि त्वचेचं सौंदर्य वाढण्यात प्राणायामाची भूमिका खूप मोठी आहे. प्राणायामामुळे तणाव कमी होतोच, तसंच शरीरात प्राणवायुचा संचारही उत्तम होतो. प्राणायाम योग्य प्रकारे श्वास घेण्याची उत्तम प्रक्रिया आहे. दररोज दहा मिनिटं प्राणायाम करण्याने शरीराचं नैसर्गिक क्लिंqजग होतं. प्राणायामामुळे केवळ शरीरालाच नाही तर मेंदूलाही रक्त आणि ऑक्सिजनचा उत्तम पुरवठा होतो.