सेलिब्रिटी टॉक्स : शर्मिला टागोर

Sandyanand    07-Jul-2020
Total Views |
 
lhjgl _1  H x W
 
 
'आराधना' चित्रपटात असलेलं 'रूप तेरा मस्ताना..' हे गाणं संस्मरणीय ठरलं आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण गाणं सलग एकाच टेकमध्ये चित्रीत केलं गेलं. एकाच टेकमध्ये याचा अर्थ, एकदा कॅमेरा सुरू झाला आणि संपूर्ण गाणं चित्रीत करूनच थांबला. एकाच टेकमध्ये गाणं चित्रीत करायचं असल्यामुळे आम्ही राऊंड ट्रॉली लावून खूप सराव केला होता. खूप तालमी केल्या आणि मग ते गाणं चित्रीत झालं. विशेष म्हणजे, ज्यांनी आमच्या बाजूला फोकस पकडलेला होता, ज्यांच्याकडे रिफ्लेक्टर होता, तेही लोक आमच्यासोबतच बाजूबाजूने फिरत होते. कारण, कोणा एकाची जरी चूक झाली असती तरी पुन्हा ते सगळं गाणं पहिल्यापासून चित्रीत करावं लागलं असतं. पण तेवढा वेळच नव्हता. कारण, त्या स्टुडिओमध्ये तो आमचा शेवटचा दिवस होता. सकाळपासून कॅमेऱ्याची काहीतरी समस्या असल्यामुळे वेळ कमी उरला होता. म्हणूनच मग शक्तीजी म्हणाले की हे गाणं आपण एकाच टेकमध्ये सलग चित्रीत करू.
 
अशीच आठवण आहे ती 'मेरे सपनों की रानी कब आयेगी तू..' या गाण्याची. 'आराधना' हा चित्रपट खूप गाजला. त्यातील फमेरे सपनों की रानी कब आयेगी तू..फ हे गाणं राजेश खन्नासाठी वेगळं आणि नंतर माझ्यासाठी वेगळं चित्रीत करण्यात आलं. कारण, आम्ही दोघेही शूqटगसाठी एकाचवेळी उपलब्ध नव्हतो. कारण, त्याचवेळी मी सत्यजीत रे यांच्या एका चित्रपटाचं चित्रीकरण करत होते. त्यासाठी मी जवळपास ४० दिवस बाहेर होते. सत्यजीत रे यांनीच मला पहिल्या चित्रपटात संधी दिली होती. त्यामुळे मी त्यांना नकार देऊ शकत नव्हते. पण, त्यांना त्यांच्या चित्रपटासाठी सलग ४० ते ५० दिवसांचं शेड्यूल करायचं होतं. मग, शक्तीजींनी थोड्याशा नाराजीनंच मला तिकडे जाण्याची परवानगी दिली. त्यामुळेच फमेरे सपनों की रानी..फ हे गाणं आम्हा दोघांसाठी वेगवेगळं चित्रीत केलं गेलं. त्यातला रेल्वेतील माझा शॉट इनडोअर घेतला गेला.