भारतात यावर्षी तरी नको आहे पर्यटन

Sandyanand    31-Jul-2020
Total Views |

1_1  H x W: 0 x 
 
'नेटा' अ‍ॅपने केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कष
 
कोरोना महामारीमुळे पर्यटन  क्षेत्राची स्थिती या वर्षाअखेरपर्यंत  सुधारण्याची शक्यता नसल्याचे 'नेटा' या अ‍ॅपद्वारे केलेल्या एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. संसर्गाच्या भीतीमुळे लोक सध्या पर्यटनाला जाण्यास तयार नसल्याचे या सर्वेक्षणात आढळले. कोरोना महामारीमुळे सगळ्याच क्षेत्रांना फटका बसला असून, त्यात पर्यटनाचाही समावेश आहे. संसर्ग आटो्नयात आल्यामुळे काही राज्यांनी पर्यटन क्षेत्र पुन्हा खुले केले असले तरी पर्यटकच  घराबाहेर पडायला तयार नाहीत. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यांनी पर्यटनासाठी  दरवाजे उघडले आहेत. मात्र, पर्यटक  सध्या त्यांना प्रतिसाद देत नसल्याचे 'नेटा'च्या सर्वेक्षणात दिसले.
 
दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासह (एनसीआर) १९ राज्यांतील ५४ हजारांपेक्षा जास्त लोक या सर्वेक्षणात सहभागी झाले होते. १६-२० जुलै या काळात हे सर्वेक्षण झाले. मात्र, किमान यावर्षी तरी पर्यटनाला  जाणार नसल्याचे ७१ टक्के लोकांनी स्पष्ट केले आणि सहा महिन्यांनंतर विचार करू, असे २५ टक्के लोकांनी सांगितले. युरोपमध्ये पर्यटनाला  प्रारंभ झाला असला, तरी भारतात मात्र ते एवढ्यात सुरू होण्याची श्नयता नसल्याचे या सर्वेक्षणातून दिसल्याची माहिती 'नेटा' अ‍ॅपचे संस्थापक प्रथम मित्तल यांनी दिली.
 
असे झाले सर्वेक्षण
१९ राज्ये (दिल्ली-एनसीआरसह)
५४ हजार सहभागी
१६-२० जुलै सर्वेक्षणाचा कालावधी
७१% यावर्षी पर्यटन  नको म्हणणारे
२५% सहा महिन्यांनी विचार करू म्हणणार