आर्थिक प्रगती करण्यासाठी काही टिप्स

Sandyanand    31-Jul-2020
Total Views |

gysgdtdx_1  H x 
 
पैसा मिळवून श्रीमंत होण्यासाठी आर्थिक शिस्त सर्वाधिक महत्त्वाची
 
छोट्या-मोठ्या उद्दिष्टांची यादी तयार करून त्यासाठी प्रयत्न करा 
 
कोणतेही यश मिळविल्यानंतर जास्त सावध राहण्याची गरज असते.
 
पैसा एकदम कधी मिळत नसतो. तो योग्य गुंतवणूक आणि बचतीतून वाढविता येतो. सध्या भरपूर उत्पन्न आहे म्हणून एकदम खर्च वाढवू नका. सध्याच्या या अनिश्चिततेच्या काळात प्रत्येक रुपया काळजीपूर्वक खर्च करायला हवा. श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्ती त्यांचे आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करत असल्याने त्या यशस्वी होतात. येथे वाचा काही प्रख्यात व्यक्तींनी पैशांबाबत दिलेले मोलाचे सल्ले.
 
कोणतेही यश कष्ट, प्रयत्नांशिवाय मिळत नसते. हाच नियम आर्थिक क्षेत्रालाही लागू पडतो. अचूक निर्णय घेऊन केलेली गुंतवणूक पैशांमध्ये वृद्धी करते. त्यासाठी हवी इच्छाशक्ती आणि नियोजन. बघा, प्रख्यात श्रीमंत व्यक्ती काय म्हणत आहेत ते...
 
उद्दिष्टांची यादी तयार करा : आपल्या उद्दिष्टांची यादी करणे केव्हाही चांगले असल्याचा सल्ला ब्रिटिश उद्योजक रिचड ब्रॅन्सन यांनी दिला आहे. मी कायम याद्या तयार करत असतो. नव्या कल्पना, कोणाला फोन करावयाचे आहेत, नव्या कंपन्या कोणत्या स्थापन करावयाच्या आहेत, अशा अनेक याद्या मी बनवित असतो. प्रत्येकाने त्याला सुचलेल्या कल्पनांची यादी बनवावी. त्यात आर्थिक बाबीसुद्धा असाव्यात. कल्पना छोटी असली तरी फरक पडत नसतो. या याद्यांमध्ये नोंद केलेल्या आर्थिक उद्दिष्टांमुळे तुम्ही ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करता, असे ते म्हणतात.
 
आवड निर्माण करा : आपल्याला नक्की कशाची आवड आहे हे समजण्यास अनेकांना बराच काळ लागतो. पैशांबाबत तसेच आहे. मुळात पैसा आणि गुंतवणूक यांची आवड किंवा आकर्षण असायला हवे. आवड असल्याशिवाय कोणत्याही क्षेत्रात यश मिळविता येत नाही. एखाद्या माणसाभोवती लोकांचा घोळका जमत असेल, तर तो यशस्वी असतो हे समजा. तुम्हीही तसे व्हा. पैशाबाबत आवड निर्माण केल्याशिवाय तो वाढणार नाही, असे प्रख्यात गुंतवणूकदार वॉरन बफे हे सांगतात.
 
यशानंतर सावध राहा : यश हा अत्यंत विचित्र शिक्षक असतो. एखादे यश मिळाल्यावर यापुढे कधीच अपयश येणार नाही अशी संबंधिताची समजूत होत, पण अशावेळी सावध राहायला हवे. कारण एकदा यश मिळाले म्हणजे भविष्यातही ते मिळेल ही समजूत चुकीची आहे. अत्यंत हुषार माणसेही अपयशी ठरतात. त्यामुळे सदैव सावध राहा, असा सल्ला ममायक्रोसॉफ्टफचे संस्थापक बिल गेट्स यांनी दिला आहे.
 
आर्थिक शिस्त पाळा : क्रेडिट काड वापरण्यासाठी तुम्ही श्रीमंत असण्याची गरज नसते; पण श्रीमंत होण्यासाठी आर्थिक शिस्तीची गरज असते, असा सल्ला मशार्क टँकफचे प्रमुख मार्क ्नयुबन हे देतात. तुम्ही निवृत्तीसाठी काही बचत करत नसाल आणि फक्त आतापुरते पाहत असाल तर श्रीमंत कसे होऊ शकाल, असा प्रश्न ते करतात. पैशाच्या व्यवहारात शिस्त आणा. चाणाक्ष खरेदीदार व्हा आणि योग्य प्रकारे पैसा वाचवा. ही सवय कायम ठेवलीत तर तुमचा पैसा वाढत जाऊन तुम्ही श्रीमंत होऊ शकता, असे ते सांगतात.
 
यश मिळविणे सोपे नसते : आर्थिक यश मिळविणे सोपे नसल्याचे सांगताना मअ‍ॅमेझॉनफचे प्रमुख जेफ बेझोस त्यांच्या एका मैत्रिणीचे उदाहμरण देतात. दोन्ही हातांवर चालण्याची तिची इच्छा होती आणि त्यासाठी तिने एक प्रशिक्षक नियुक्त केला. पहिल्याच दिवशी त्याने एक मोलाचा सल्ला दिला. तो म्हणजे, आपण खूप मेहनत केली तर दोन आठवड्यांत हातांवर चालणे श्नय होईल असे बहुतेकांना वाटते. पण, सहा महिने रोज सराव केल्याशिवाय ते श्नय नाही. आपल्या आर्थिक उद्दिष्टांबाबतही तेच असते. खूप कष्ट केल्यावर पैसा मिळतो असे नसते. अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न केल्यावर यश मिळते. घर घ्यावयाचे असेल, तर त्यासाठी वेळ लागतो हे विसरू नका, असे बेझोस हे सांगतात.
 
फक्त यश आणि यशच नव्हे : अमेरिकन उद्योजक डायमंड जॉन यांनी यश, यश, यश आणि यश असे यशाचे सूत्र नसल्याचे स्पष्ट केले आहे. यश,यश, अपयश आणि यश असे प्रगतीचे सूत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी आयुष्यात खूप प्रगती केली आणि यशसुद्धा मिळविले. पण, प्रत्येकामागे फक्त पैसा हे कारण नव्हते असे ते सांगतात.
 
वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष नको : आर्थिक उद्दिष्टे सांभाळतान वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू नका, असे उद्योजक जेफ बुसांग यांचे सांगणे आहे. मिळालेल्या माहितीकडे दुर्लक्ष केल्याने किंवा नाकारल्याने आर्थिक फटका बसतो, असे इशारा त्यांनी दिला आहे. आपली आर्थिक स्थिती कायम तपासत राहा. आपल्यावर किती कर्ज आहे याची माहिती तुम्हाला हवी आणि त्याच्यासाठी नियोजन हवे, असे ते म्हणतात.
 
अनावश्यक खर्च रोखा : घरखर्चाचे महिन्याचे अंदाजपत्रक तयार केले, तर अनावश्यक खर्च किमान दहा ट्न्नयांनी कमी होऊन दरमहा सुमारे शंभर डॉलर शिलकीत पडतात, असा सल्ला अमेरिकन आर्थिक सल्लागार सुझी ओरमन यांनी दिला आहे. कोणत्याही खरेदीपूर्वी त्या वस्तूवर सवलत मिळते आहे का याची तपासणी करा. त्यातूनही पैसा वाचतो, असे त्या म्हणतात.
 
अपयश स्वीकारायला शिका
आर्थिक उद्दिष्टे गाठताना काही वेळा अपयश येते. पण त्यात फार गुंतून न जाता ते स्वीकारायला शिकावे, असे मत अमेरिकन उद्योजिका सारा ब्लॅ्नले यांनी व्यक्त केले आहे. अपयशातून तुम्हाला एखादा धडा न कळत मिळालेला असल्याने त्याचा उपयोग करून भविष्यातील योजना आखा असे त्या सांगतात.
 
जोखीम ठरवा
जोखीम जेवढी मोठी तेवढेच यशाचे प्रमाण जास्त असते. पण, याचा अर्थ तुम्ही एकदम मोठी जोखीम पत्करावीत असा नसल्याचे अमेरिकेतील ऑनलाइन रिटेलर वर्बी पार्कर हे स्पष्ट करतात. पैसे मिळविण्यासाठी एकदम मोठी उडी घेण्याऐवजी सावकाश गुंतवणूक करा. त्यातून पुढे जास्त जोखीम घेणे श्नय होते, असे ते सांगतात.