रिक्त खाटांची माहिती 'डॅशबोर्ड'वर

31 Jul 2020 13:16:34

rt_1  H x W: 0  
मीरा-भाईंदर महापालिकेचा उपक्रम
 
मीरा-भाईंदर शहरातील कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका व खासगी रुग्णालयांत खाटा उपलब्ध होत नसल्याची तक्रार रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. खासगी रुग्णालयांकडून खाटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याने रुग्णांना मुंबईतील खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करावे लागत होते. त्यामुळे पालिका आणि खासगी रुग्णालयांतील खाटांची माहिती देण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेने 'डॅशबोर्ड'[ विकसित केला आहे. कोणत्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, याची ऑनलाइन माहिती या डॅशबोर्डवर मिळणार आहे. मीरा-भाईंदरमध्ये दिवसेंदिवस कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिका रुग्णालयांत रुग्णांना खाटा उपलब्ध नाहीत, अशा तक्रारी रुग्णांचे नातेवाईक करत होते. त्यामुळे रुग्णांना नाइलाजास्तव खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो आहे.
 
राज्य सरकारने कोरोनाबाधितांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयांत खाटा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी एकूण खाटांपैकी ८० टक्के खाटा स्थानिक प्रशासनाच्या नियंत्रणाखाली आणल्या आहेत. तसेच, रुग्णांच्या उपचारांसाठी दरही निश्चित केले आहेत. मात्र, सरकारी आदेशाचे उल्लंघन करून खासगी रुग्णालये ८० टक्के खाटांची माहिती महापालिकेला देण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे. या पाश्र्वभूमीवर पालिका आणि खासगी रुग्णालयांतील खाटांची माहिती देण्यासाठी मीरा-भाईंदर पालिकेने मडॅशबोर्डफ स्थापन केला आहे. रुग्णांना आता थेट रुग्णालयांत न जाता  www.covidbedmbmc.. ळप या संकेतस्थळावर जाऊन कोणत्या रुग्णालयात किती खाटा रिक्त आहेत, याची ऑनलाइन माहिती मिळणार आहे. तसेच, महापालिकेच्या ०२२-२८१४१५१६ या हेल्पलाइनवर खाटांची, रुग्णवाहिकेची व शववाहिकेची नोंदणी करता येईल. तसेच, उपलब्ध खाटांची माहिती मिळणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0