म्हाडातर्फे ३०६ सदनिकांचा ताबा लाभ्यार्थ्यांना देण्याची कार्यवाही सुरू

Sandyanand    31-Jul-2020
Total Views |
 
ty_1  H x W: 0
 
 
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नाशिकच्या आडगाव येथील सहा जणांना दिला ताबा
 
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नाशिकमधील आडगाव येथे उभारण्यात आलेल्या ४४८ सदनिकांपैकी सदनिकेची संपूर्ण विक्री किंमत भरलेल्या ६ लाभाथ्र्यांना नुकताच सदनिकांचा ताबा देण्यात आल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाने तयार केलेल्या नियमावलीचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आडगावमधील या कार्यक्रमाला म्हाडाचे मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नाशिकमधील आडगाव येथे गट क्रमांक १५६० मध्ये राबवण्यात आलेल्या या योजनेत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ४४८ सदनिका व ३२ दुकानांची उभारणी करण्यात आली असून, ३०६ सदनिकांची ताबा देण्याची कार्यवाही सुरू आहे.
 
या सदनिकांसाठी पात्र अर्जदारांकडून मागणी आजमावण्यासाठी जाहिरात देऊन अग्रीम अंशदान तत्त्वावर अर्ज मागवण्यात आले. ४४८ सदनिकांपैकी ३०८ सदनिकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानास पात्र लाभाथ्र्यांची केंद्राच्या पीएमवाय- एमआयएस या पोटलवर नोंदणी करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लाभाथ्र्यांना प्रति सदनिका राज्य शासनाचे एक लाख व केंद्राचे दीड लाख, असे एकूण अडीच लाख रुपये अनुदान मिळणार असून, सदनिकेची अंदाजित विक्री किंमत ७ लाख ४० हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पार्किंग अधिक ७ मजल्यांच्या ४ इमारती बांधण्यात आल्या आहेत. प्रत्येक इमारतीत १ बीएचके स्वरूपाच्या सदनिका असून तीन लिफ्ट, प्रशस्त सोसायटी कार्यालय, कव्हर्ड पार्किंग, सामायिक संरक्षक भिंत आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. योजनेतील उर्वरित १४२ सदनिकांसाठी व ३२ दुकानांसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. या कार्यक्रमाला नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी किशोरकुमार काटवटे, कार्यकारी अभियंता केदारे यांच्यासह म्हाडा नाशिक मंडळातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.