लग्न रोखण्यासाठी कोरोना ठरले कारण !

Sandyanand    30-Jul-2020
Total Views |
 
4_1  H x W: 0 x
 
कोरोनाचा बागुलबुवा उभा करून गैरफायदा कसा घेतला जातो याचा अनुभव नुकताच एका प्रेमी युगुलाला आला. हे युगूल जेव्हा लग्नाची कागदपत्रे करण्यासाठी जिल्हा न्यायालयात पोचले तेव्हा वधूचे नातेवाईक आले आणि वकिलांना म्हणाले, तिच्यापासून दूर रहा, तिला विषाणू बाधा झाली आहे. आरोग्य विभागाच्या हेल्पलाइनवर फोन करून त्यांनी ही माहिती दिली. आजारी असताना मुलगी लग्नासाठी कोटात आल्याचे आरोग्य विभागाला सांगण्यात आले. हे ऐकताच कोटातील टायपिस्ट, वकील आणि इतर लोक घाबरले. वकील वीरेंद्र वर्मा यांनी काम करण्यास नकार दिला. तपासणी करा आणि बरे झाल्यावर लग्नासाठी परत या, असा सल्ला त्यांनी दिला. तक्रार ऐकून आरोग्य विभागाचे कर्मचारी आले आणि संबंधित युवतीचे नमुने घेऊन चाचणीला पाठवले, तसेच तिला विलगीकरणात पाठवून दिले. मुलगी १९ वर्षाची आणि मुलगा २२ वर्षाचा आहे. घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. आता रिपोट चांगला आल्यावर आम्ही लग्न करू, असे युवतीने म्हटले आहे.