लहान मुलांना मोबाइलचे व्यसन लागण्यास आजी-आजोबा जबाबदार

Sandyanand    28-Jul-2020
Total Views |

५_1  H x W: 0 x 
 
मुलांना वाईट सवयी लागल्या तर लोक पालकांना दोष देतात व आईवडिलांनी मुलांवर चांगले संस्कार केले नाहीत, असा आरोप करतात. पण मुलांना कॉम्प्युटर आणि मोबाइल फोन अ‍ॅडि्नट बनविण्यात आई-वडिलांपेक्षा आजी-आजोबाच जास्त जबाबदार असल्याचे नुकत्याच केलेल्या पाहणीतून निष्पन्न झाले आहे. हे अध्ययन जर्नल ऑफ चिल्ड्रेन अँड मीडियामध्ये प्रकाशित झाले आहे. मुलांचा आई-वडिलांपेक्षा आजीआजोबांकडे जास्त ओढा असतो. कारण आई-वडील मुलांना त्यांच्या मनासारखे वागू देत नाहीत, तर आजीआजोबा नातवंडांचे लाड करून त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याची मोकळीक देतात. त्यामुळे आई- वडील कामावर गेल्यानंतर मुले आजीआजोबांसोबत राहून टी.व्ही. पाहणे, मोबाईलवर गेम खेळणे, कॉम्प्युटर किंवा टॅब्लेटवर जास्तीत जास्त वेळ घालवितात, तर आजी-आजोबा नातवंडांना रोखण्याऐवजी यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊन कौतुकच करतात. जर मूल चार तास आजीआजोबांच्या सान्निध्यात राहिले, तर मुले या चार तासांपैकी दोन तास कॉप्युटर किंवा मोबाइलवर घालवितात, असे २ ते ७ वर्षांची मुले आणि ३५६ आजी आजोबांचे अध्ययन केले असता निष्पन्न झाले आहे.