सेलिब्रिटी टॉक्स : धर्मेंद्र

Sandyanand    28-Jul-2020
Total Views |

५_1  H x W: 0 x 
 
मी जो कोणी आहे तो आई-वडिलांच्या संस्कारांमुळे, त्यांच्या शिकवणीमुळे असं नेहमीच सांगतो. पण, तरीही माझ्या लहानपणी चित्रपटांशी संबंधित असं काहीच वातावरण आजूबाजूला नव्हतं. माझे वडील शिक्षक होते. त्यामुळे चित्रपटही कधी पाहिले नाहीत. मला आठवतंय ते म्हणजे, त्यांच्या शाळेतून बाहेर पडल्यानंतर मी पहिला चित्रपट पाहिला तो होता 'शहीद.' दिलीपकुमार, कामिनी कौशल वगैरे शहजादे, अप्सरांना पाहिल्यानंतर मला त्यांच्याबद्दल फारच आकर्षण वाटलं. मला वाटलं की मला त्यांच्याकडेच गेले पाहिजे. माझी जागा त्यांच्यासोबतच आहे. माझी इच्छा इतकी तीव्र होती की, त्यामुळेच खुद्द परमेश्वरही पाघळला असेल आणि त्यामुळे मला ही संधी मिळाली, असं मला वाटतं. काही निर्माते म्हणत की, अरे तुझ्यासारख्या पैलवानांनी कुस्ती केली पाहिजे, तू चित्रपटात काय करणार..? 'बंदिनी' या चित्रपटासाठी माझी निवड झाल्यानंतरचा एक किस्सा असाच आहे.
 
बिमलदा किंवा गुरुदत्त ही मंडळी अगदी आरामात चित्रपट करत असत. चित्रपटात काम करण्याच्या इच्छेने मी मुंबईत पोहोचलो. पण, सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणाला मुंबईसारख्या शहरात उदरनिर्वाह करणं सोपं नव्हतं. त्याच दरम्यान फलव्ह इन सिमलाफ या चित्रपटासाठी मला विचारणा झाली. पण, टेस्ट झाल्यावर ते म्हणाले की, आम्हाला चित्रपटासाठी हीरो हवा आहे, हॉकी खेळाडू नको. हे असे किस्से घडत राहिले. पण, काम मागताना मी कधी लाजलो नाही. पूजा समजून प्रत्येक काम करत राहिलो. आत्मसन्मान सोडला नाही. जबाबदारीची जाणीव विसरलो नाही. तसाच एक किस्सा आहे की, मी बऱ्यापैकी पैसे मिळवू लागल्यानंतर १८ हजार रुपयात एक फियाट गाडी घेतली होती. माझा भाऊ अजित मला म्हणाला, की अरे ती दुसरी अमुक तमुक गाडी घ्यायची ना... हीरोला शोभली असती. मी म्हटलं की, या इंडस्ट्रीचा काही भरवसा नाही. इथेच करिअर करायचं आहे. पण, तोपर्यंत जर वेळ लागला तर मग याच फियाटची टॅक्सी करुन चालवू, तसाच संघर्ष करू.