म्हैसूरचा राजवाडा

Sandyanand    26-Jul-2020
Total Views |
 
gh_1  H x W: 0
 
राजे वडियार यांचा हा राजवाडा. त्यांचा अंबा पॅलेस आवर्जून पाहावा असा. येथे आहे डॉल पॅव्हेलियन, युरोपियनइंडियन शिल्पे, सेरेमोनियल वस्तू. दरबार हॉलमधील कोरीव खांब अप्रतिमच. वडियारांसाठी अतिशय अभिमानाची असलेली ही वास्तू म्हणजे रॉयल गोल्डन थॉर्न. त्यांच्या सार्वभौमत्वाचे हे प्रतीक. दसऱ्याचा उत्सव हा येथील मोठा उत्सव. त्या दिवशी राजाची आजही मिरवणूक काढली जाते. हा महाल तेव्हा पाहण्यासाठी खुला असतो. विवाह पॅव्हेलियनमध्ये आहेत पेंटिंग्ज, टाईल फ्लोअरिंग, कास्ट आयर्नचे खांब, झुंबरे आणि स्टेन ग्लास वर्क. याच परिसरात अनेक देवळे आणि समाध्याही आहेत. आकाराने प्रचंड असलेला हा राजवाडा आजही अत्यंत उत्तम स्थितीत जतन केला गेला आहे. राजवाड्यात आत जाण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. कोरीव कामाने नटलेले खांब, छत, दरवाजे आणि जगभरातून गोळा केलेल्या कलात्मक वस्तूंचे संग्रह. सुरुवातीला हा राजवाडा पूर्ण लाकडातच बांधला होता. मात्र, तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे हा नवा राजवाडा १९११-१२ मध्ये पुन्हा बांधण्यात आला. इंग्लिश आर्किटेक्ट हेन्सी आयर्विन याने त्यासाठीचा आराखडा तयार केला होता. ही वास्तूरचना qहदू आणि मुघल शैलीचे मिश्रण असून घुमट, कमानी, प्रशस्त व्हरांडे ही याची वैशिष्ट्ये.