डोंगर कसे बनतात ?

25 Jul 2020 13:12:54
 
 
उंच असलेल्या जमिनीच्या भागास वाढत्या उंचीनुसार उंचवटा, टेकाड, टेकडी,डोंगर, कडा किंवा पर्वत म्हणतात. जमिनीपेक्षा खालच्या पातळीवर असलेल्या भागास वाढत्या खोलीनुसार खळगा, खाच, खड्डा, दरी किंवा खाई म्हणतात. सामान्यतः पर्वतांच्या सलग रांगा आणि श्रेणी असतात. पर्वतमाथ्याच्या निमुळत्या भागाला शिखर म्हणतात. दोन किंवा अधिक शिखरे जोडणाऱ्या लांबट भागाला कटक आणि अशा अनेक सलग कटकांना डोंगररांगा म्हणतात. सामान्यतः पर्वताहून लहान उंचवट्याला डोंगर आणि डोंगराहून लहान उंचवट्याला टेकडी म्हणतात. अनेक डोंगर व पर्वत एकमेकांना जोडलेले असले म्हणजे ती पर्वतश्रेणी होते
Powered By Sangraha 9.0