आता घराबाहेर पडण्याचीसुद्धा अनेकांना वाटते भीती

Sandyanand    24-Jul-2020
Total Views |

abc_1  H x W: 0 
 
 
लॉकडाऊन नंतर पुन्हा कामाला प्रारंभ करताना आहे चिंता
 
संसर्गाची, मन्यू नॉर्मलफच्या नियमांची वाटते आहे काळजी
 
घरातच बसल्याने बदललेले शारीरिक घड्याळ पूर्ववत होण्यास वेळ लागणार
 
'कोव्हिड-१९'च्या साथीमुळे सर्वांत मोठा परिणाम झाला आहे तो मनावर. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचा उपाय अमलात आणला गेला. पण सतत घरी बसण्यामुळे आणखी एक नवा प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे बाहेर पडण्यास भीती वाटण्याचा! लॉकडाऊन काहीसे शिथिल झाल्यामुळे व्यवहार सुरू होऊ लागले आहेत. संसर्गाचा धोका असला, तरी त्यातून आता बाहेर पडावे लागणार आहे. पण आता काहींना घराबाहेर पडण्याचीच qहमत होत नसल्याचे चित्र आहे...
 
कोणत्या साथीचा समाजावर काय परिणाम होईल, हे समजण्यासाठी काही काळ जावा लागतो. भारतात कोरोनाचा संसर्ग साधारणत: फेब्रुवारीच्या शेवटच्या काळात सुरू झाला. संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू झाल्याने सगळे व्यवहार थंडावले. काङ्र्मालये आणि कारखाने बंद झाले, शैक्षणिक संस्थांचे काम थांबले. अगदी सार्वजनिक वाहतुकीच्या रेल्वे, बस आणि विमानसेवाही बंद झाल्या. काहींना घरातून काम करण्याची सोय असल्याने त्यांचे काम सुरू आहे. ही सोय नसलेल्यांना मात्र वेळ कसा घालवावा, असा प्रश्न पडला. त्यातच कोरोनाविषयक नकारात्मक बातम्यांची माहिती सतत कानांवर पडते आहे. उत्पादन थांबल्यामुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला तर काहींना पगारात कपात स्वीकारावी लागली. या सगळ्यांतून निर्माण झाले भीतीचे वातावरण. साथ कधी संपेल हे सांगता येत नाही आणि भवितव्य कसे असेल याचा कसलाच अंदाज नाही, अशा कात्रीत भयाची भावना वाढणे साहजिक आहे.
 
आता लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सवलत मिळाल्याने व्यवहार सुरू होत आहेत. घरांत बसलेले लोक बाहेर येण्यास उत्सुक असतील आणि कधी एकदा कामाला प्रारंभ करतो असे त्यांना वाटत असल्याची तुमची समजूत असेल तर ती चुकीची आहे. सतत घरात बसल्यामुळे अनेकांना आता बाहेर पडण्याचीच भीती वाटायला लागली असून, त्याला मानसोपचारतज्ज्ञांनी लॉकडाऊननंतरची भीती (पोस्ट लॉकडाऊन अ‍ॅने्िनसटी) असे नाव दिले आहे. बाहेर पडण्याची परवानगी असली, तरी काही बंधने पाळावी लागणार आहेत. ती पाळणे आपल्याला जमेल का, हे या भीतीमागचे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशी भीती वाटत असल्यामुळे आपल्या कार्यालयात  जाणे, मित्रांना भेटणे, सलून किंवा उद्यानांसारख्या सार्वजनिक जागांवर जाणे याचीसुद्धा अशा लोकांना भीती वाटायला लागली आहे. काय असावीत यामागची कारणे? मदीर्घकाळ घरात बसावे लागल्यामुळे आता एकदम बाहेर पडण्याची भीती वाटणे साहजिक असते, असे मुंबईतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सोनिया चड्ढा या सांगतात. कोरोनाच्या साथीमुळे यावर्षी लोकांची दैनंदिन जीवनाची लयच बिघडून गेली आहे आणि घरातले सुरक्षित वातावरण सोडून बाहेर पडावेसे आता वाटत नसल्याने ही भीती निर्माण होते, असे त्या स्पष्ट करतात. याला त्या मकम्फट झोनफ असे म्हणतात. लॉकडाऊनमुळे घरी बसावे लागले. त्यामुळे अनेकांना झोपेतून उशिरा उठायची सवय लागली.
 
काहींनी सोयीच्या वेळेत काम करण्याची सवय केली, काहींनी तंदुरुस्तीवर भर दिला तर काहींनी छंद जोपासण्यावर भर दिला. या सगळ्याचे रुटिन बसले असताना लॉकडाऊन शिथिल झाले. हे सोडून बाहेर पडण्याची अनेकांची इच्छा नाही, असे डॉ. सोनिया सांगतात. कोलकात्यात मानवी संसाधन क्षेत्रात काम करणाऱ्या धारा राठोड हे त्याचे उदाहरण म्हणावे लागेल. त्या म्हणतात, लॉकडाऊनच्या काळात घरीच असल्यामुळे माझे सासू-सासरे आणि चार वर्षांच्या मुलीची काळजी घेण्यात माझा वेळ छान जात होता. पण लॉकडाऊन शिथिल झाल्याने मला घरात राहून आठवड्यातील चार दिवस काम करावे लागत आहे. त्यामुळे सासू-सासरे आणि मुलीकडे दुर्लक्ष होईल, याची भीती वाटते. मी काम सुरू केल्यावर पहिल्याच दिवशी तिच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मुलीने रडून गोंधळ केला. मला बाहेर जावेसे वाटत नाही.' व्यवहार सुरू झाले असले, तरी बाहेर गेल्यावर संसर्गाची शक्यता आहेच. अशा या 'न्यू नॉर्मल' स्थितीत बाहेर पडण्याची अनेकांना भीती वाटते आहे. घर हीच सर्वांत सुरक्षित जागा असल्याने ती सोडून बाहेर जायची आणि तेव्हाही सुरक्षेचे सर्व नियम पाळण्याची खबरदारी घ्यावी लागण्याची अनेकांना चिंता वाटत असल्याचे डॉ. सोनिया यांनी नमूद केले. 'लॉकडाऊनपूर्वी बाहेर जेवायला जाणे, चित्रपट पाहणे, मित्रांबरोबर गप्पा मारणे नेहमीचे होते.
 
आता गेल्या काही महिन्यांत या सवयी गेल्या आहेत. बाहेर गेलो, तर अनेक दुकाने बंदच आहेत. शिवाय संसर्गाची दहशत पाठ सोडत नाही. त्यामुळे घरी बसणेच सुरक्षित वाटते. वेळ घालविण्यासाठी मी मालिका बघत बसतो,' असे मुंबईतील एक संगीतकार साहिल शर्मा यांनी सांगितले. माणूस हा समाजप्रिय असल्याने समूहाने राहतो. पण कोरोनाचा एक विचित्र परिणाम म्हणजे काहींना आता समाजात मिसळण्याचीच भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे असे लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. पुण्यातील कुणाल सिंह हा विद्यार्थी म्हणतो, 'गेले तीन महिने एकट्याने काढल्याने आता मला कोणाला भेटायचीसुद्धा भीती वाटते. अगदी जवळच्या मित्रांनाही भेटण्यास मी घाबरतो. संसर्गाच्या भीतीबरोबरच एवढा काळ एकट्याने राहिल्यामुळे मी समाजात वावरू शकेन की नाही याची देखील भीती वाटते.' दिवसभरात आपला कोणाबरोबर संपर्क नसण्याची कल्पनाही साथीपूर्वी कोणी करू शकत नव्हते. त्याला 'फिअर ऑफ मिसिंग आऊट' (फोमो) असे म्हटले जात होते. साथीच्या काळात मात्र चित्र उलटे झाले असून, आता 'जॉय ऑफ लेटिंग  गोफ (जोलो) हा ट्रेंड आला आहे. घरातच असल्याने पुरुषांना शॉट किंवा पायजम्यात वावरण्याची आणि दाढी करणे टाळण्याची सवय लागली. स्त्रियांबाबत त्यांना मेकअप न करता आणि आरामदायी कपड्यांत वावरण्याची सवय लागली. आता कामाला जायचे म्हटल्यावर दोघांनाही व्यवस्थित राहावे लागणार आहे. या सवयी सोडून पुन्हा रुटिन सुरू करणे त्रासदायक ठरणार असल्याचे मत पुण्यात मानवी संसाधन क्षेत्रात काम करणाऱ्या सीमा सिंह यांनी व्यक्त केले.
 
या भीतीवर मात करण्यासाठी...
 
  • या वातावरणात भीती वाटणे साहजिक असल्याचे लक्षात घ्या आणि त्याबद्दल संकोच वाटून घेऊ नका.
 
  • बाहेर पडावे लागणारच असल्याने सुरूवातीला एका वेळी एकच गोष्ट करा. म्हणजे कामासाठी कार्यालयात  जाणार असाल, तर तेवढेच करा. काही दिवसांनी त्याची सवय झाल्यावर सार्वजनिक उद्यानांसारख्या जागांवर जाणे सुरू करा. काही काळ तेथेही फार वेळ घालवू नका.
 
  • सध्या एका वेळी एकाच व्यक्तीबरोबर संवाद ठेवा. तुम्हाला बाहेर जाणे शक्य होत नसेल, तर त्या व्यक्तीला घरी बोलावून तिच्याबरोबर बोला. त्यामुळे तुम्हाला सुरक्षित वाटेल.
 
  • गेले काही महिने तुम्ही घरीच असल्याने तुमच्या शारीरिक घड्याळात बदल झाले आहेत आणि नव्या स्थितीबरोबर जुळवून घेताना त्याला वेळ लागेल हे विसरू नका. हे घड्याळ पूर्ववत करण्यासाठी काही उपाय करावे लागतील, ते तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करा. या काळात स्वत:च्या वेळापत्रकाबाबत अति काटेकोर राहू नका. 
 
  • पुन्हा कामाला प्रारंभ म्हणजे आपले छंद सोडून देणे असा निराशाजनक विचार करू नका. कामाचे वेळापत्रक व्यवस्थित जुळवून छंद जोपासा, व्यायामही करत राहा.
 
  • संसर्ग टाळण्याची पूर्ण खबरदारी घेणे हाच त्याच्या भीतीतून बाहेर येण्याचा मार्ग आहे. मास्क, ग्लोव्हज आदी वापरा, हात स्वच्छ धुवा आणि परस्परांत पुरेसे अंतर ठेवा. मनातील भीती पूर्णपणे दूर होईपर्यंत  उद्याने किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. 
             (बंगळुरूमधील क्लिनिकल  सायकॉलॉजिस्ट डॉ. सरस्वती गांधी यांनी दिलेला सल्ला).
 
 
 
 
सध्या काही जणांमध्ये सार्वजनिक ठिकाणांबाबतची भीती (असेीरहिेलळर) दिसून येत आहे. यात समाजात वावरण्याची भीती वाटते. गर्दीच्या ठिकाणी जाण्यास असे लोक घाबरतात. अशा माणसांना घराबाहेर पाऊलसुद्धा टाकण्याची भीती वाटते. - डॉ. गरिमा गरेवाल, क्लिनिकल  सायकॉलॉजिस्ट, नवी दिल्ली