बॉलिवूड सोडून दे! करण जोहरचा कंगनाला सल्ला

Sandyanand    24-Jul-2020
Total Views |
 
abc_1  H x W: 0
 
सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमच्या मुद्द्यांवरून अभिनेत्री कंगना रनौतने दिग्दर्शक करण जोहरवर निशाणा साधला होता. त्यानंतर सोशल मीडियावरदेखील करणला ट्रोल करण्यात आलं. यावेळी कंगनाने स्वतःला आणि या इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या नवीन कलाकारांना बॉलिवूडमध्ये येणाऱ्या अडचणी सांगितल्या. तिने आपले काही व्हिडीओदेखील सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. यामध्ये  तिने दिग्दर्शक करण जोहर याच्यावर निशाणा साधला होता. यामुळे प्रेक्षकांनी करण जोहर याला सोशल मीडियावर ट्रोल केले. यावर करण जोहरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
 
अभिनेत्री कंगना रनौतला इंडस्ट्रीमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर तिने कलाविश्व सोडावं, असं वक्तव्य दिग्दर्शक करण जोहरने एका मुलाखतीदरम्यान केलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना करण म्हणाला, 'कंगनाने प्रत्येकवेळी असं भासवलं आहे की तिच्यावर इंडस्ट्रीमध्ये कायम अन्याय होत आला आहे. तुम्ही असं सतत तुमची दुःख आणि तुमच्यावर होणारा अन्यायाची कारणे सांगू शकत नाही आणि जर तिला अन्याय झाला असे वाटत असेल तर तिने खुशाल कलाविश्वाला रामराम ठोकावा. कोणीही तिला बॉलिवूडमध्ये थांबण्याची जबरदस्ती केलेली नाही. अभिनेत्री कंगना रनौत सध्या सोशल मीडियावर चांगलीचं चर्चे त आहे. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी दिग्दर्शक करण जोहर, सलमान खान, एकता कपूर यांच्यावर सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होतेय.