थरच्या वाळवंटात काही भागात खुरटी-काटेरी झुडपे व निवडूंग आढळतात. वाळवंटात लूनी ही एकच महत्त्वाची नदी व अनेक खारी सरोवरे आहेत. थरचे वाळवंट भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे वाळवंट आहे. भारतपाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमा या वाळवंटातून जाते. पूर्वी या वाळवंटाला 'मरुस्थली' म्हणत. यालाच भारताचे 'मोठे वाळवंट' म्हणतात.
थरचे वाळवंट भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे वाळवंट आहे. भारत-पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमा या वाळवंटातून जाते. पूर्वी या वाळवंटाला मरुस्थली म्हणत.यालाच भारताचे ममोठे वाळवंटफ म्हणतात. याने राजस्थान राज्याचा बराच भाग व्यापला असून, पंजाब राज्याचा दक्षिण भाग, पाकिस्तानातील सिंध, खैरपूर आणि बहावलपूर या प्रांतांचाही काही भाग व्यापलेला आहे. हा भारतातील अतिउष्ण भाग आहे. संपूर्ण वाळवंट वालुकामय असून, बऱ्याच ठिकाणी, त्यात प्राचीनकाळी नद्यांनी आणून टाकलेला गाळ व माती आणि खडक झिजून तयार झालेली वाळू यांचा समावेश आहे. पूर्वेस अरवली पर्वताच्या बाजूस खडकाळ टेकड्या आणि पश्चिमेस सिंधच्या बाजूस वाळूच्या टेकड्या आढळतात. वाळूच्या टेकड्यांचा आकार लाटांप्रमाणे असून, त्या ईशान्य व नैर्ऋत्येकडे पसरलेल्या आहेत. या वाळूच्या टेकड्यांची उंची पूर्वेकडून पश्चिमेस वाढत जाते. वाळवंटाच्या काही भागात खुरटी-काटेरी झुडपे व निवडूंग आढळतात. वाळवंटात लूनी ही एकच महत्त्वाची नदी व अनेक खारी सरोवरे आहेत. दैनिक तापमान कक्षेत खूपच तफावत असते. दुपारचे तापमान ४९ अंशपर्यंत वाढते. जोधपूर, बिकानेर, बारमेर, जैसलमेर येथे कमाल तपमान ५० अंशपर्यंत असत