१६० कि.मी. वेगाने उडणारा सर्वात वेगवान पक्षी

24 Jul 2020 12:53:21

 
 
 
'अँडियन काँडॉर' दक्षिण अमेरिकेतच आढळणारा गिधाडाच्या कुळातील पक्षी जगात सर्वांत मोठा आहे. त्याची उड्डाणाची क्षमतासुद्धा अफाट आहे. पंखांची हालचाल न करता तब्बल १६० किलोमीटरचे अंतर हा पक्षी एकावेळी पार करतो!
 
दक्षिण अमेरिकेत केलेल्या अभ्यासानंतर संशोधकांनी काढला निष्कर्ष अँडीज पर्वतराजीतील प्रतिकूल हवामानातसुद्धा करतो सुरळीत उड्डाण उड्डाणाच्या काळात १.३ टक्के वेळाच हे पक्षी करतात पंखांची फडफडजीवसृष्टीत पक्षी ही निसर्गाची बहुधा सर्वांत सुंदर निर्मिती आहे. त्यांचे मनोहारी रंग, गोड आवाज आपल्याला मोहून टाकतात. जीवसृष्टीत प्रत्येक जिवाची एक भूमिका असते. उपद्रवी कीटक खाऊन, झाडांच्या बियांचा प्रसार करून पक्षी आपल्याला एकप्रकारे मदतच करत असतात. पक्ष्यांचे जीवनमान हा एक गूढ विषय आहे. अनेक पक्षी वेगवेगळ्या ऋतुंमध्ये स्थलांतर करतात. ते स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय असू शकते. उत्तरेतील अतिकडा्नयाच्या थंडीत अनेक पक्षी तुलनेने कमी थंडी असलेल्या दक्षिणेकडे जातात. रशियाच्या जीवघेण्या थंडीपासून बचावासाठी अनेक पक्षी भारतात तात्पुरता आश्रय घेतात. अगदी लहानापासून प्रचंड आकारापङ्र्मंत पक्षी असतात.
 
दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतराजीमधील 'अँडियन काँडॉर' ( Andean condor) हा आकाराने सर्वांत मोठा पक्षी आहे. त्याचे वजन १६ किलोग्रॅम असते आणि पंखांचा विस्तार असतो ३.३ मीटर (सुमारे दहा फूट दहा इंच). त्याचे उडणे हाही एक चमत्कार म्हणावा लागेल. कारण संपूर्ण उड्डाणात तो फक्त १.३ वेळा पंख फडफडवितो! एवढा वजनदार पक्षी सलग पाच तास उडू शकतो यावर विश्वास बसत नसला, तरी ते सत्य आहे. एकदा उड्डाण केल्यावर तो पंख न फडफडविता तब्बल १६० किलोमीटर अंतर कापू शकतो, असे त्याच्यावर केलेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. ब्रिटनमधील स्वान्सी विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून हे सत्य सामोरे आले. त्यांनी काँडॉरच्या एका थव्याचा पाच वर्षे अभ्यास करून बरीच माहिती मिळविली आहे. \
 
या विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ एमिली शेपड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २०१३ ते २०१८ या काळात अर्जेंटिनातील बारिलोचे येथे आठ काँडॉरच्या एका थव्याचा अभ्यास केला. त्यात सगळे तरुण पक्षी होते.त्यासाठी त्यांनी थव्यातील प्रत्येक पक्ष्याच्या शरीरात 'फ्लाइट रेकॉडर' हे उपकरण बसविले. विविध मोसमांत हे पक्षी कसे उड्डाण करतात, याची माहिती मिळविण्यासाठी हे उपकरण बसविण्यात आले होते. त्यातून खूप आश्चर्यकारक माहिती मिळाली. 'फ्लाइट रेकॉडर' बसविलेल्या एका अँडियन काँडॉरने या काळात पंख न फडफडविता पाच तास उड्डाण केले. या काळात त्याने १७२ किलोमीटर अंतर कापले होते. अत्यंत बेभरवशाच्या हवामानासाठी कुख्यात असलेल्या अँडीज पर्वतात हवेचे प्रवाह उलट-सुलट वाहत असतानाही या काँडॉरने अत्यंत सावकाश उड्डाण करत हा प्रदेश ओलांडला. या पक्ष्यांच्या उड्डाणाचा २३० तासांपेक्षा जास्त वेळा अभ्यास करून माहिती मिळविण्यात आली. उड्डाणाच्या काळात १.३ टक्के वेळाच हे पक्षी पंखांची फडफड करत असल्याचे त्यातून दिसले. मोठा आकार आणि जास्त वजनामुळे काँडॉरना जमिनीवर उतरताना जास्त ऊर्जा वापरावी लागते. पण उड्डाण केल्यावर मात्र ते काटेकोरपणे ऊर्जेचा वापर करत असल्याचे लक्षात आले.
 
दीर्घायुषी 'अँडियन काँडॉर'- दक्षिण अमेरिकेत आढळणारा 'अँडियन काँडॉर' हा मनव्या जगातील गिधाडफ म्हणूनही ओळखला जातो. 'कॅथटाइड' या कुळात त्याचा समावेश होतो. दक्षिण अमेरिकेचा पश्चिम भाग आणि अँडीज पर्वतरांगेत त्याचे वास्तव्य असते. प्रशांत महासागरालगतही तो आढळतो. काळ्या रंगाच्या या पक्ष्याची पिसे मानेजवळ पांढरट असतात. हा प्रामुख्याने हरणे आणि गुरांच्या कुजलेल्या मांसावर जगतो. डोंगरांच्या उंच कड्यांवर यांची घरटी असतात आणि मादी एका वेळी एक किंवा दोन अंडी देते. याचे जीवनमान ७० वर्षांपङ्र्मंत असते. दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना, बोलेव्हिया, पेरू, चिली, कोलंबिया आणि इ्नवेडोर या देशांचे राष्ट्रीय प्रतीक 'अँडियन काँडॉर' आहे. मात्र, निवासस्थानांवर होत असलेल्या अतिक्रमणामुळे या पक्ष्याला 'आययूसीएन' या संघटनेने धो्नयात आलेली प्रजाती म्हणून जाहीर केले आहे.
Powered By Sangraha 9.0