कुक आयलँडचे नाव बदलण्यासाठी ६० पेक्षा जास्त सूचना

Sandyanand    24-Jul-2020
Total Views |

scv_1  H x W: 0 
 
कूक आयलँड हा देश न्यूझीलंडच्या ईशान्येला ३००० किलोमीटर अंतरावर आहे. हा पंधरा बेटांचा समूह आहे. सहाव्या शतकात पोलिनेशियाई वंशाचे लोक ताहिती बेटावरून या बेटावर आले. ताहिती बेट कुक आयलँडपासून १२०० किलोमीटर अंतरावर आहे. प्रशांत महासागरात त्रिकोणाच्या आकाराचे हे बेट वसले आहे. अठराव्या शतकात कॅप्टन जेम्स कुक या ब्रिटिश दर्यावर्दीने  या बेटाचा शोध लावला. यामुळे १८३५ मध्ये त्याला कुक आयलँड असे नाव देण्यात आले. आता या बेटाचे नाव बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्या नावासाठी लोकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. या बेटाची लोकसंख्या सुमारे १७ हजार ५०० एवढी आहे. या देशाचा मुख्य उद्योगपर्यटन  हा आहे. हा देश १९६५ मध्ये स्वतंत्र झाला.