जगावेगळ्या परंपरा असलेली भारतातील काही प्रसिद्ध मंदिरे

23 Jul 2020 12:48:36

lhjgl _1  H x W 
 
राजस्थानमधील मेहेंदीपूर बालाजीचे मंदिर अगदी खास आहे. येथे तथाकथित झपाटलेल्या व्यक्तींना त्यांच्यावरील नकारात्मक शक्तीचा प्रभाव हटवण्याच्या उद्देशाने आणले जाते. भारतातील मंदिरांमध्ये काही विशिष्ट अशा परंपरा आहेत. परंतु काही मंदिरांतील परंपरा अगदीच विचित्र आहेत. राजस्थानमधील मेहेंदीपूर बालाजीचे मंदिर अगदी खास आहे. येथे तथाकथित झपाटलेल्या व्यक्तींना त्यांच्यावरील नकारात्मक शक्तीचा प्रभाव हटवण्याच्या उद्देशाने आणले जाते.
 
अंगातून भूत काढण्यासाठी त्या व्यक्तीला छताला टांगणे, त्याचं डोके भिंतीवर  आदळणे, त्यांना साखळदंडांनी भिंतीला  बांधून ठेवणे, त्यांच्या अंगावर उकळते पाणी ओतणे अशा प्रकारचे अघोरी म्हणावेत, असे उपाय केले जात असतात. या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना कोणताही प्रसाद दिला जात नाही. तसेच मंदिरातून माघारी जाताना मंदिराकडे कोणीही मागे वळून पाहू नये, असा येथील प्रघात आहे. सर्वांत प्राचीन शक्तीपीठांमध्ये आसामच्या देवी मंदिराचादेखील समावेश आहे. हे मंदिर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तीन दिवस बंद ठेवले जाते. त्यावेळी देवीला मासिक धर्म सुरू असतो. अशी येथील लोकांची मान्यता आहे. यावेळी दर्शनाला येणारे भाविक देवीला प्रसाद म्हणून लाल रंगाचे कापड दान देतात.
 
राजस्थान येथील ओम बत्रा मंदिराला बुलेटबाबा मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरामध्ये कोणतीही मूर्ती नसून ओमसिंह राठोडनामक मृत व्यक्तीची मोटारसायकल आहे. १९८८ मध्ये ओमसिंहचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर त्याची मोटारसायकल पोलिसांनी पंचनाम्यासाठी जप्त केली. पण ही मोटारसायकल आपोआप ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी जाऊन उभी राहिली. पोलिसांनी ही मोटारसायकल पुन्हा पोलीस ठाण्यात आणली असता पुन्हा तेच घडले. असे अनेकदा घडले असून हा दैवी चमत्कार आहे, असे समजून जिथे मोटारसायकल उभी होती तिथे गावकऱ्यांनी मंदिर बनविले. आजही तिथे कोणाकडे नवे वाहन आले, की वाहन आणि वाहनचालक सुरक्षित राहावा, यासाठी अनेक भाविक आवर्जून दर्शनाला येत असतात. उज्जैन येथील कालभैरव मंदिरामध्ये प्रसाद म्हणून मद्य दिले जाण्याची परंपरा आहे. देवालाही प्रसाद म्हणून मद्याचा नैवेद्य दाखविला जातो. हे मद्य देवाच्या मूर्तीच्या मुखामागे अर्पण केले जाते. सर्व मंदिराबाहेर ज्याप्रमाणे फुलाच्या हारांची किंवा प्रसादाची दुकाने असतात. त्याप्रमाणे या मंदिराच्या बाहेर मद्याची दुकाने आहेत. केरळ येथील भगवती मंदिरामध्ये भरणी उत्सवामध्ये भाविक लाल रंगाची वस्त्रे परिधान करतात आणि स्वत:च्या शरीरावर तलवारींनी आघात करून घेण्याची प्रथा आहे. हा उत्सव सात दिवस सुरू राहतो.
Powered By Sangraha 9.0