जगात प्रथमच रोबोटचे तत्त्वज्ञानावर व्याख्यान

21 Jul 2020 12:52:33
 
lhjgl _1  H x W
 
                                          अमेरिकेतील मिलिटरी अ‍ॅकॅडमीच्या शंभर विध्यार्थ्यांची उपस्थिती
 
जगात प्रथमच रोबोटने ले्नचर दिले आहे. ही कामगिरी ह्यूमनॉयड रोबोट बीना४८ने केली आहे. बीना४८ युनिव्हर्सिटीत ले्नचर देणारी पहिली रोबोट प्रोफेसर ठरली आहे. तिने अमेरिकेत वेस्ट पॉइन्ट मिलिटरी अ‍ॅकॅडमीमध्ये तत्त्वज्ञानावर (फिलॉसॉफीवर) ले्नचर दिले. या वेळी युनिव्हर्सिटीचे १०० विद्यार्थी उपस्थित होते. तसेच तिने यावेळी तत्त्वज्ञानाशी निगडित दोन सत्रे घेतली. यामध्ये तिने विध्यार्थ्यांना नैतिकता आणि समाजात एआयच्या वापराविषयी सांगितले. बीना४८ला दीर्घ काळासाठी वापर करणारे विलियम बॅरी यांनी तिचा वापर शैक्षणिक क्षेत्रात करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी तिला क्लासरूमसाठी तयार केले. ले्नचर सुरू होण्यापूर्वी बीना४८ने तत्त्वज्ञानाशी निगडित डेटा आणि कोर्स मटेरियल डाऊनलोड केले. त्यानंतर तिने विलियम बॅरीच्या लेसन प्लॅनबरोबर एकत्रितपणे ले्नचर दिले. या दरम्यान तिने विद्यार्थ्यांच्या  प्रश्नांची उत्तरेही दिली. तथापि, यासाठी विध्यार्थ्यांना तिच्यापेक्षा थोड्या मोठ्या आवाजात आपले प्रश्न विचारावे लागले. विलियम सांगतात, 'आम्ही तिला म्हटले की तिने इंटरनेटला चिकटून राहू नये. कारण ती कोणतीही माहिती विकिपीडिया, स्टॅनफोड एनसाय्नलोपीडिया ऑफ फिलॉसॉफीमधून सुलभपणे घेऊ शकत होती. आम्ही तिला निश्चित ले्नचरसाठी तयार केले.' नुकतेच सौदी अरबमध्ये एक रोबोट सोफियाला मानद नागरिकता देण्यात आली होती. सोफियाने प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
Powered By Sangraha 9.0