जॉर्जियात महिला टॅक्सि ड्रायव्हरने एका आजारी, वृद्ध व्यक्तीचे आयुष्य बदलले

Sandyanand    20-Jul-2020
Total Views |
 
abc_1  H x W: 0
 
एका महिला टॅ्नसी ड्रायव्हरने एका वृद्ध प्रवाशाची स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. ती त्यात यशस्वीही झाली. हे तिचे आदर्श वागणे इतरांनाही प्रेरणादायी ठरेल... लॉरेन मुलविहिल एक टॅक्सि ड्रायव्हर आहे. पण तिच्याबाबतीत नुकतेच असे काही घडले की तिने एका आजारी वृद्धाचे आयुष्य बदलून टाकले. लॉरेनला मागच्या आठवड्यात हॉस्पिटलमधून फोन आला की, ८९ वर्षांचे एक वृद्ध रोनाल्ड डेंबनर यांना सुटी मिळाली आहे आणि त्यांना घरी सोडून यायचे आहे. लॉरेन जेव्हा रोनाल्ड यांना घेऊन जॉर्जियात त्यांच्या घरी जात होती तेव्हा, तिला अपेक्षा होती की, तेथे त्यांच्या कुटुंबातील लोक मिळतील.
 
जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा रोनाल्डनी सांगितले की, ते घरी आपल्या कुत्र्याबरोबर एकटेच राहतात. कारण त्यांची पत्नी आणि इतर सदस्यांचा मृत्यू झाला आहे. लॉरेन तेव्हा त्यांना घेऊन घरात गेली. आतील दृश्य पाहून ती आश्चर्यचकित  झाली. सर्व घर अस्ताव्यस्त पडले होते. बाथरूममध्ये ओल होती. गालिचा भिजलेला होता. फरशीवर जागोजागी कुत्र्याची घाण पडली होती आणि जिन्याची रेलिंगही तुटली होती. रोनाल्ड मानसिकदृष्ट्या पूर्णपणे स्वस्थ असूनही त्यांना योग्य प्रकारे चालता-फिरता येत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घराची देखभाल होऊ शकत नव्हती. ते कोणाला घरी बोलविण्यासही घाबरत होते. कारण त्यांना वाटत होते की, कोणी आला तर तो त्यांचे घर आणि कुत्रा त्यांच्यापासून हिरावून घेईल. लॉरेनला या वृद्धाना अशा स्थितीत सोडणे बरोबर वाटले नाही. म्हणून तिने सोशल मीडियावर रोनाल्डच्या मदतीसाठी एक ग्रुप तयार केला. तिने त्यावर लिहिले की, ममी रोनाल्डचे घर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मी एक सिंगल आई आहे आणि माझी मुले माझ्यापासून जास्त काळ लांब राहू शकत नाहीत. रोनाल्डना कोणाच्या मदतीची गरज आहे. पण ते त्यासाठी काही देऊ शकत