यशासाठी मोठा विचार करा आणि मोठे होत राहा

02 Jul 2020 12:32:22




आपल्या सगळ्यांनाच मोठं व्हायचं असतं, त्यासाठी मोठ्या विचारांचा मालक होणं आवश्यक आहे. खरंतर आपली विचारसरणीच आपल्या भविष्याची निर्माण करत असते. मग मोठ्या विचारांचा मालक आपण का नाही व्हावं? याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ...


एकदा बालवाडीच्या शिक्षिकेनी आपल्या एका विद्यार्थ्याला विचारलं, तू काय करतोस? त्यावर विद्यार्थी म्हणाला, देवाचं चित्र काढतोय. यावर शिक्षिका म्हणाली, देव कसा दिसतो, हे तर कोणालाच माहित नाही. मुलगा म्हणाला, आता सगळ्यांना समजेल. याला म्हणतात मोठा विचार. मोठा विचार करणारे लोक अगदी या मुलासारखे असतात, ते पूर्ण विश्वासाने जगत असतात आणि मोठ्या विचाराने काम करत असतात. 

विश्वासाची गरज   
विश्वासाची खूप जास्त गरज आहे. हिंमतीने आपल्या उच्च कल्पना सत्यात उतरविण्यासाठी विश्वासाची गरज असते. मोठा विचार करणाऱ्या व्यक्ती स्वतः वर विश्वास ठरतात. असं तेव्हाच होतं जेव्हा आपण सकारात्मक विचारांबरोबर जगतो आणि सकारात्मक तरंग आपल्याला जाणवायला हवेत. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या उच्च विचारांना साकार करू शकता. 

रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी पंधरा मिनिटं त्या गोष्टींची कल्पना करा, जसं तुम्हाला व्हायचं आहे. कल्पनेमध्ये चित्र तशी बघा, जसं तुम्हाला अपेक्षित आहे. 

एका यशस्वी माणसासारखी तुमची वागणूक असायला हवी. तुमची उठण्या-बसण्याची, चालण्या-फिरण्याची धाटणीही तशीच हवी. 

जेव्हा बघायचीच असतात, तेव्हा मोठी स्वप्नं बघा. मग त्या दिशेने पावलं उचला. स्वप्नं बघण्याने तुमच्या विचारांमध्ये मजबूती येईल. काम तर करायचं आहेच. अन्न तर वाघाच्या तोंडातही आपोआप जात नाही. काहीही करण्यापूर्वी यशाची कामना करा. यामुळे तुम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल. 

कोणतंही काम करण्यापूर्वीच जेव्हा मनात शंका येते, तेव्हा यश कसं मिळणार? असा विचार अजिबात करू नका की, असं का झालं? लक्षात ठेवा, तुमचे विचार जेवढे मोठे आणि आत्मविश्वासाने भरलेले असतील, तुम्ही जेवढ्या उच्च कल्पना कराल, तेवढंच उच्च आणि मोठं यश मिळेल. 

मोठं व्हायचं की छोटं, हे केवळ तुमच्या विचारांवर आणि कर्तव्यावर अवलंबून आहे. तेव्हा मोठा विचार करा आणि मोठे व्हा!
Powered By Sangraha 9.0