ते तुमचा भार उचलतात तुम्ही त्यांची काळजी घ्या

02 Jul 2020 12:32:18




आपल्या पायांना आपण नेहमी जपले पाहिजे. बरेचवेळा आपण आरोग्याच्या दृष्टीने किंवा एकूणच पायांकडे जरा दुर्लक्ष करतो. पायांचे तळवे मुलायम रहावे यासाठी त्यात कुठल्याही तेलग्रंथी नसतात. म्हणूनच पायांची सगळ्याच मोसमात विशेष देखभाल करावी लागते. पावसाळ्यात तर पायांची खूप काळजी घेतली पाहिजे. 

१. टाचांना भेगा का पडतात :
शरीरात कॅल्शियमची आणि स्निग्ध पदार्थांची कमतरता असेल तर टाचांना भेगा पडतात. टाच आणि तळपायाची त्वचा मुळातच कठीण आणि जाडसर असते. त्याला स्क्रब करून तिथली मृत त्वचा काढून टाकावी लागते. दररोज अंघोळीच्या वेळी टाचा घासत चला. त्यानंतर दररोज बाहेर पडतांना आणि झोपताना संपूर्ण टाचेला मॉईश्चरायझर लावत जा म्हणजे टाचा मुलायम राहतील. 

२. पावसाळ्यात अशी घ्या पायाची काळजी : 
रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवा. ते कोरड्या स्वच्छ कापडाने पुसा. तळपायाला चांगल्या दर्ज्याचे फुटक्रीम लावा आणि मग झोपा. पिकलेल्या केळाचा गर घ्या आणि त्यात ऑलिव्ह ऑईल घाला आणि हे मिश्रण तळपायाला लावा यामुळे फरक पडेल.


आठवड्यातून एकदा झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात लिंबाच्या रसाचे थेंब घाला आणि त्यात १५ मिनिटे पाय बुडवून ठेवा आणि नंतर पाय पुसून घ्या. दररोज पाय साफ करून झाल्यावर ग्लिसरीन आणि गुलाबपाणी पाण्यात घालून त्यात पाय बुडवून ठेवा. पॅडीक्योर करून देखील पायांची चांगली देखभाल करता येते.


दर १५ दिवसांनी तळपायांना तेलाचे मालिश करत करत चला यामुळे तळपाय नरम राहतात.


बेकिंग सोडा सगळ्यांच्या किचनमध्ये असतोच. घरी आल्यानंतर जर तुम्हाला स्वत:साठी वेळ मिळत असेल तर तुम्हाला हा प्रयोग करायला हरकत नाही. गरम पाण्यात तुम्हाला १ मोठा चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे. या पाण्यात तुम्हाला तुमचे पाय २० ते ३० मिनिटे ठेवायचे आहेत. पाण्यातून पाय काढून तुम्हाला ते कोरडे करुन घ्यायचे आहेत. तुम्हाला पाय कोरडे केल्यानंतर लगेचच पायात झालेला बदल जाणवेल. शक्य असल्यास हा प्रयोग रोज करण्यासही काही हरकत नाही. 
Powered By Sangraha 9.0