भंगारात लागली लॉटरी!

02 Jul 2020 12:32:21


                  lottery_1  H x       lottery_2  H x


ज्या वस्तूला भंगारात पाच रुपयेही मिळणार नाहीत, ती वस्तू मित्रामित्रांत किंवा परिचितांमध्ये लावलेल्या अनौपचारिक सेलमध्ये सहज ५० रुपयांना विकली जाऊ शकते. त्या माणसालाही ती बाहेर ५०० रुपयांना मिळणार असते. यात दोहोंचा फायदा होतो.


आपल्याकडे जुन्या वस्तू आपण थेट भंगारात काढतो. आपल्याला त्या वस्तूंची किंमत माहिती नसते. जुन्या बाजारात किंवा चोरबाजारात किंवा अँटिक शॉपमध्ये ती वस्तू घ्यायला गेलं की तिची किंमत ऐकून डोकं चक्रावतं. आपण भंगाराच्या भावाने केवढा अनमोल खजिना विकला हे लक्षात येतं. पाश्चिमात्य देशांमध्ये अनेक प्रकारचे सेल ठेवले जातात. गराज सेल हा त्यातलाच एक प्रकार. 

आपल्याला नको असलेल्या वस्तू, कपडे वगैरे भंगारात काढण्याऐवजी किंवा बोहाऱ्यांना देण्याऐवजी मित्रपरिवारामध्येच ते विकायचे. खरं सांगायचं तर हे एक स्नेहसंमेलनच असतं. त्यात गराज सेल हा एक जोड उपक्रम असतो. अशाच प्रकारचे सेल माणसं एकमेकांमध्ये करतात. ज्या वस्तूला भंगारात पाच रुपयेही मिळणार नाहीत, ती वस्तू मित्रामित्रांत किंवा परिचितांमध्ये सहज ५० रुपयांना विकली जाऊ शकते. त्या माणसालाही ती बाहेर ५०० रुपयांना मिळणार असते. यात दोहोंचा फायदा होतो. इथे अशाच सेलमध्ये भंगारात लागलेली लॉटरी दिसते आहे. 

एकाने गंजलेला डोअर नॉकर म्हणजे दरवाजा वाजवण्याचं साधन अगदीच कवडीमोल भावात विकत घेतलाय. नंतर त्याला कळलं की एकतर तो १०० वर्षं जुना आहे, मौल्यवान आहे आणि त्यावर घरात सुखसमृद्धी आणणाऱ्या एका देवाची मूर्ती आहे. दुसरीकडे असाच भंगारात पडलेला मासा हा एक प्रकारचा आकाशकंदिल आहे आणि त्यात दिवा घातल्यानंतर त्याचं रूपच पालटून जातं.
Powered By Sangraha 9.0