उत्तम आरोग्यासाठी कडीपत्त्याची फोडणी द्याच!

Sandyanand    02-Jul-2020
Total Views |


kadipatta_1  H


१. एनीमिया होण्यापासून वाचवतो :
कडीपत्ता आयर्न आणि फॉलिक अ‍ॅसिडचा स्रोत असतो. आयर्नची कमतरता फक्त शरीरात आयर्न नसल्याने नाही तर शरीरामध्ये आयर्न मुरत नरल्यामुळेही होते. याव्यतिरीक्त फॉलिक अ‍ॅसिड आयर्न शोषून घेण्यास मदत करते. कडीपत्ता या दोन्ही कामांसोबत एनीमिया कमी करण्यात मदत करतो. 


२. यकृतासाठी फायदेशीर :
जर तुम्ही सतत दारुचे सेवन करत असाल आणि यामुळे यकृताला धोका पोहोचत असेल तर जेवनात कडीपत्ता खाणे विसरु नका. संशोधनानुसार दारुमुळे यकृताला धोका निर्माण होतो. परंतु तुम्ही जर कडीपत्त्याचे सेवन केले तर त्यामधील व्हिटामिन ए आणि सी यकृताला योग्य प्रकारे काम करण्यासाठी मदत करतात.


३. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते : कडीपत्त्यामध्ये जे फायबर असतात, ते रक्तामधील इन्सुलिनला प्रभावित करुन ब्लड-शुगरचे प्रमाण कमी करते. यासोबतच कडीपत्ता पचन शक्ती वाढवून वजन कमी करण्यासाठी मदत करतो.


४. हृदय रोगापासून दूर ठेवतो :
कडीपत्ता रक्तातील कोलेस्ट्रॉलला कमी करुन एक चांगली भूमिका बजावतो. हे रक्तामधील चांगल्या कोलेस्ट्रॉलाच्या प्रमाणात वाढ करून हृदयरोग आणि एन्थेरोक्लेरोसीसचे रक्षण करते.


५. पचनशक्ती वाढवते : कडीपत्त्यातील गुण अ‍ॅसिडिटी आणि अपचनाच्या समस्येपासून दूर ठेवतात. आयुर्वेदात मानले जाते की, कडीपत्त्यामध्ये जे लॅक्सेटिवचे गुण असतात ते पोटाला शांत ठेवतात आणि पचनशक्ती वाढवतात.


६. अतिसारच्या लक्षणांपासून वाचवते : कडीपत्त्यामध्ये जे माइल्ड लॅक्सेटिवचे गुण असतात ते अतिसारापासून आराम देण्यात मदत करतात. कारण यामधील जीवाणूविरोधी आणि आणि वेदनाशामक गुणांमुळे हे पोटातील वेदनांना लवकर शांत करतात. कडीपत्ता शरीराच्या तीन दोषांना संतुलित करुन पोटातील पित्तदोषाला कमी करतो.


७. केमोथेरपीच्या साइड इफेक्टला कमी करतो : संशोधनानुसार कडीपत्त्यामध्ये एवढी क्षमता असते की तो केमोथेरपी आणि रेडियोथेरपीमुळे शरीराला होणारे नुकसान कमी करण्यास मदत करतो. हे क्रोमोसोम्स आणि बोन मॅरोला कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवून शरीरात फ्री-रॅडिकल्स तयार होण्यापासून थांबवते. याच प्रकारे कडीपत्ता शरीराला कॅन्सर होण्यापासूनसुद्धा वाचवतो.


८. छाती आणि नाक : जर तुम्ही खोकला, साइनस किंवा कफने त्रस्त असाल तर कडीपत्त्याचा आपल्या आहारात वापर करा, तुमचा त्रास कमी होईल. कडीपत्त्यामधील व्हिटॅमिन सी, वेदनाशामक आणि अँटी-ऑक्सिडेंट हे गुण कफ साचू देत नाही. कफामुळे छाती गच्च झाल्यास आराम मिळवण्यासाठी एक छोटा चमचा कढीपत्त्याच्या पावडरमध्ये एक चमचा मध टाकून पेस्ट बनवा आणि दिवसातून दोन वेळा सेवन केल्यास कफाचा त्रास कमी होतो.


९. स्किन इन्फेक्शन होत नाही : कडीपत्त्याचे अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरीयल, अँटी-फंगल गुण नखातील फंगल इन्फेक्शन आणि पिंपल्स येण्यापासून वाचवतात. यासोबतच यांना लवकर बरे करण्यासदेखील मदत करतात. 


१०. केस लवकर वाढतात : कडीपत्त्यामधील पौष्टीकतेमुळे केसांच्या समस्या उद्भवत नाहीत. यामुळे अवेळी पांढरे होणारे केस, केसांचे गळणे, केस पातळ होणे, कोंडा अशा अनेक समस्यांपासून कडीपत्ता आपल्याला दूर ठेवतो. केसांना मजबूत बनवण्यासाठी आणि कोंड्यापासून वाचण्यासाठी कढीपत्त्याचा रस १०० एम.एल. खोबऱ्याच्या तेलात मिसळावा. मिश्रण काळे होईपर्यंत गरम करुन डोक्यावर लावल्यास केसांना त्याचा खूप फायदा होतो.