उद्योगपतींच्या ताफ्यात महागड्या मोटारी

Sandyanand    02-Jul-2020
Total Views |


cars_1  H x W:


बीएमडब्ल्यू, मर्सिडीझ, टोयोटा गाड्यांचा समावेश 


मोटारींचा शौक असणारे भारतातही अनेक जण आहेत. आवड म्हणून आणि स्टेटस सिम्बॉल म्हणून महागड्या मोटारी घेणारे अनेक जण आहेत. त्यामुळे देशातील रस्त्यांवर दुर्मिळ मोटारीही दिसू लागल्या आहेत. 


विशेष म्हणजे, या दुर्मिळ मोटारींकडे लक्ष वेधले जावे, यासाठी त्यामागे सुरक्षा मोटारीही धावत आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ आणि टाटा सफारी या दोन मोटारी लोकांची पहिली आवड समजली जाते. मात्र, सुरक्षेसाठी वेगळ्या मोटारींना पसंती दिली जाते. सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या काही मोटारी.   

बीएमडब्ल्यू एक्स ६ एम हमान टायकून 
किंमत : साडेतीन कोटी रुपयांपेक्षाही अधिक भारतातील ही दुर्मीळ मोटार समजली जाते. उद्योगपती पुनावला कुटुंबाकडे ही मोटार आहे. या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी ती वापरण्यात येते. ही मोटार ६७० पीएएस पर्यंतच्या उर्जेवर चालू शकते. केवळ ४.२ सेकंदात ती १०० किलोमीटर वेगाने धावू शकतो. हा वेग प्रति सेकंद २५० किलोमीटरपर्यंत वाढू शकतो. या मोटारीची कार्यक्षमता उच्च स्तरापर्यंत वाढवता येते.

मर्सिडीझ - बेन्झ जी ६३ एएमजी
किंमत : सुमारे दोन कोटी रुपये ही मोटार लोम्बार्गिनी हराकेनची सुरक्षा करणारी मोटार समजली जाते. दुसऱ्या पिढीतील लोम्बार्गिनी अधिक किंमतीची आहे. या मोटारीला व्ही ८ इंजिन असते. भारतातील गर्दीमध्येही ती चालू शकते.

लँड रोव्हर डिस्कव्हरी 
किंमत : ६० लाख रुपये अंबानी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी लँड रोव्हर डिस्कव्हरी या गाड्याही वापरल्या जातात. या कुटुंबाच्या सुरक्षा गाड्यांच्या ताफ्यात यांची संख्याही उठून दिसते.

लँड रोव्हर रेंज रोव्हर स्पोर्ट 
किंमत : सुमारे ९० लाख रुपये अंबानी कुटुंबाच्या ताफ्यात काही रेंज रोव्हर स्पोर्ट एसयूव्ही गाड्यांचाही समावेश आहे. काही गाड्यांवर निशाणी करण्यात आली आहे. साधारणतः अंबानी कुटुंबातील मुलांच्या सुरक्षेसाठी या गाड्या वापरल्या जातात.

बीएमडब्ल्यू ७- सेरिझ 
किंमत : सुमारे एक कोटी ही मोटार श्रीमंत उद्योगपतींच्या दैनंदिन वापरात असते. साधारणतः लोम्बार्गिनी हराकेनच्या सुरक्षेसाठी ही मोटार वापरली जाते. या मोटारीमध्ये खास आरएस एक्झॉस्ट सिस्टीम बसवण्यात आली आहे. 

टोयोटा लँड क्रुझर प्रादो 
किंमत : एक कोटी रुपयांपेक्षाही अधिक ही एसयूव्ही बुलेटप्रूफ मोटार पुढील काही दशके सेवा देऊ शकेल. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी २०१५मध्ये चार टोयोटा लँड क्रुझर प्रादो खरेदी केल्या होत्या. त्यांच्या सुरक्षा ताफ्यात या मोटारींचा समावेश करण्यात आला. ही मोटार ज्या पद्धतीने रस्त्यावरून धावते, ते पाहाणे आनंददायी असते.

बीएमडब्ल्यू एक्स ५ 
किंमत : ८५ लाख रुपये अंबानी कुटंबाकडे देशातील काही सर्वाधिक महागड्या मोटारी आहेत. या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रारंभी महिंद्रा स्कॉर्पिओ वापरण्यात येत असे. मात्र, काही वर्षांपूर्वी यात बदल करून त्यांच्या ताफ्यात बीएमडब्ल्यू एक्स ५ एसयूव्ही दाखल झाली. त्यांच्याकडे सध्या या प्रकारच्या पाच ते सहा मोटारी आहेत.